सांगोला पोलीस ठाणे फरारी आरोपीची मालमत्ता जप्त करणार . सांगोला ( प्रतिनिधी ) : - फरार आरोपी हे जर २४ तासात शरण आले नाही , तर त्यांचे घर असेल , जमीन असेल , प्लॅट असेल व इतर प्रॉपटी जप्त करण्याची सांगोला पोलीसांनी सुरवात केलेली आहे . गुन्हेगारांनी मस्ती केली तर सोडणार नाही . आमच्या हातात कायदेशीर लेखणी आहे .
त्या लेखणीच्या उपयोग करून मस्ती उतरवली जाईल व कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले . संगोला पोलीस ठाणे येथे दि . २४/०४/२०२१ रोजी गु.र.नं. ३ ९ ६ / २०२१ मधील भा .. द.वि. कलम ३०७ , ५०४ , ५०६ , ३४ दाखल असून सदरचा गुन्हा हा त्यांनी बेकायदा वाळू उपसा करण्याच्या कारणावरून घडलेला आहे . गुन्हा घडल्यापासुन सदर आरोपी फरार आहेत . पोलीस त्यांच्या पाठीमागे आहेत परंतु ते पोलीसांना हुलकावणी देवून अद्यापपर्यंत फरार आहेत . हे आरोपी जर कोणाला दिसले तर पोलीसांना माहीती दयावी व आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल , असे आवाहन सांगोला पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले आहे .
0 Comments