निकालादिवशी घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर होणार कडक कारवाई आ . भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झाले . यानंतर सहा महिन्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली . यामध्ये ...आ . भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झाले .
यानंतर सहा महिन्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली . यामध्ये भाजपकडून समाधान आवताडे , राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके , स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा मोठ्या पक्षांसह इतर संघटनांनीही उमेदवार दिला होता . यामुळे ४ एप्रिलपासून पंढरपूर - मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री , दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष , आमदार , खासदार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या सभा झाल्या . त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील नागरिक प्रचारासाठी ठाण मांडून बसले होते . निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक सभेला हजारोंची गर्दी झाली होती . यामुळे निवडणुकीनंतर अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत .निवडणूक लागण्यापूर्वी पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आढळून येत होती . मात्र निवडणूक झाल्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत आहे . ' त्या ' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे . यामुळे अधिक बिकट प्रकृती असलेले रुग्ण इतर जिल्ह्यात , शहरात उपचार मिळवण्यासाठी जात आहेत . तर अनेकांना जीवही गमवावा लागला आहे . २ मे रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी व निकाल लागणार आहे . यामुळे पंढरपुरात अधिक गर्दी होऊ शकते . यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाचा अधिक प्रसार होऊ शकतो . यामुळे मतमोजणी दरम्यान पंढरपुरात गर्दी होऊ नये , यासाठी कडक पावले उचलावीत , अशी मागणी नागरिकांतून होत आहेगर्दी टाळण्यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त पंढरपूर येथे कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहेत . मतमोजणी दिवशी फक्त उमेदवारासह प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे . अन्य लोकांनी रस्त्यावर फिरू नये . अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . त्याचबरोबर पंढरपुरात वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे . यामध्ये ५ अधिकारी , ३० कर्मचारी व सीआरपीएफच्या पथकाचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले . मतमोजणीसाठी १४ टेबल कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याकारणाने फक्त १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे . मतमोजणीसाठी उमेदवाराच्या १४ प्रतिनिधीना प्रवेश दिला जाणार आहे .परिसरात २०० मीटरच्या आसपास नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले . असे वाढत गेले कोरोना रुग्ण ३ एप्रिलला ९ ८ रुग्ण , ४ एप्रिलला ७५ रुग्ण , ५ एप्रिलला १०४ रुग्ण , ६ एप्रिलला १०३ रुग्ण , ७ एप्रिलला १२४ रुग्ण , ८ एप्रिलला १४१ रुग्ण , ९ एप्रिलला १५१ रुग्ण , १० एप्रिलला २१५ रुग्ण , ११ एप्रिलला ८२ रुग्ण , १२ एप्रिलला २४४ रुग्ण , १३ एप्रिलला ११५ रुग्ण , १४ एप्रिलला १४१ रुग्ण , १५ एप्रिलला ३४० रुग्ण , १६ एप्रिलला २५५ रुग्ण , १७ एप्रिलला २४६ रुग्ण , १८ एप्रिलला १११ रुग्ण , १ ९ एप्रिलला २ ९ ४ रुग्ण , २० एप्रिलला ३५ ९ रुग्ण , २१ एप्रिलला २१४ रुग्ण , २२ एप्रिलला ३७५रुग्ण , २३ एप्रिलला ३७८ रुग्ण , २४८ एप्रिलला ५०२ रुग्ण , २५ एप्रिलला २२२ रुग्ण , २६ एप्रिलला ४३५ रुग्ण .
0 Comments