google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार ?

Breaking News

सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार ?

 सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार,खातेदारांना काय करावं लागणार ?या सात बँकांमध्ये खातं असणाऱ्या ग्रहकांसाठी महत्वाची माहिती बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक,पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत.एक एप्रिलनंतर देशातील सात बँकांच्या ग्राहकांना दैनंदिन बँक व्यवहारांमध्ये या बदलाचा परिणाम जाणवू शकतो.


एक एप्रिल 2021 पासून अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आय.एफ.एस.सी कोड निष्क्रीय होणार आहेत.त्यामुळे या सात बँकांमध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांनी बँकेत फोन करुन आपला नवीन कोड जाणून घेणं फायद्याचं ठरु शकतं.बदलेला कोड ठाऊक असल्यास ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना काही अडचणी येणार नाहीत.

 देना बँक,विजया बँक,कॉर्पोरेशन बँक,आंध्रा बँक,ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स,यूनायटेड बँक आणि इलाहाबाद बँकेच्या ग्राहकांना एक एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांचा फटका बसू शकतो.जर या सता बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आयएफएससी कोडसंदर्भात माहिती घेणं फायद्याचं ठरेल.

 एक एप्रिल २०२० पासून सरकारने देशातील तीन बँकांच्या विलनीकरणाचा निर्णय घेतला आहे.यामध्ये पंजाब नॅशनल बँक,ओरिएंटर बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाच्या विलनीकरण होणार आहे.त्याचबरोबर विजया बँकेचं विलनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं असून हा बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहे.त्याचबरोबर सिंडिकेट बँक,कॅनरा बँकेत तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँके ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे.तसेच इलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन होणार आहे.

 आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन लॉगइन करण्यासाठी नव्या आयएफएससी कोडचा वापर करु शकतात. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना www.unionbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी लागले.या वेबसाईटवरील अमल्गमेशन सेंटर पर्यायावर क्लिक करावं लागेल. येथे क्लिक केल्यानंतर नवीन आयएफएससी कोडसंदर्भातील माहिती ग्राहकांना मिळेल. तसेच बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकांवर 18002082244 अथवा 18004251515 अथवा 1800425355 वर फोन करुन ग्राहक माहिती घेऊ शकतात.एस.एम.एसच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आलाय.यासाठी ग्राहकांना जुना आयएफएससी क्रमांक, 'IFSC स्पेस 00000 (OLD IFSC) स्पेस' अशा स्वरुपात 9223008486 वर पाठवल्यावर नवीन आय.एफ.एस.सी क्रमांक कळू शकतो.

 आय.एफ.एस.सी कोडमध्ये बदल झाल्यास त्याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होतो.अर्थात लगेच ग्राहकांना गोंधळून जाण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही.सर्व शाखांमध्ये जुन्या आय.एफ.एस.सी कोडवरुन ३१ मार्च २०२१ पर्यंत व्यवहार सुरु राहणार आहेत.बँकांनाही या नवीन बदलांसंदर्भात ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केलीय.ऑनलाइन व्यवहार करताना खाते क्रमांकाबरोबरच बँकेचा आयएफएससी कोडही आवश्यक असतो.इंडियन फाइनॅनशियल सिस्टीम कोड म्हणजेच आयएफएससी कोड हा प्रत्येक शाखेला देण्यात आलेला विशेष क्रमांक असतो.भारतामध्ये एकाच बँकेच्या अनेक शाखा असल्याने केवळ पत्त्यावरुन त्यांची ओळख पटवणे कठीण होत असल्याने हे क्रमांक देण्यात आले आहेत.

 बदललेल्या माहितीनंतर मिळालेल्या चेकबुक आणि पासबुकसंदर्भातील माहिती ग्राहकांना या बँक खात्यांवरुन होणाऱ्या व्यवहारासंदर्भातील संस्थांना कळवणं गरजेचं आहे. यामध्ये म्यूचुअल फंड्स,ट्रेडिंग अकाऊंट,विमा कंपन्या,आयकर विभागाशीसंबंधित खातं,एफ.डी किंवा आर.डी,पी.एफ खातं आणि इतर महत्वाच्या ठिकाणी बँकेच्या बदलेल्या आय.एफ

 एस.सी संदर्भात माहिती ग्राहकांना द्यावी लागेल.

Post a Comment

0 Comments