google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसाची मास्क न वापरण्यावर कडक कारवाई

Breaking News

सांगोला पोलीसाची मास्क न वापरण्यावर कडक कारवाई

 सांगोला पोलीसाची मास्क न वापरण्यावर कडक कारवाई सोलापुर जिल्हयात ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणु संसर्गचा प्रादुर्भाव रोखणेकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडुन केलेल्या आहेत.सांगोला पोलीस स्टेशनकडुन आत्तापर्यंत सांगोला शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे उल्लघंन करणा-या नागरीकावर एकुण २१,०४१ केसेसे करून ३१,७१,७५० रू लाखाचा दंड सांगोला पोलीसानी वसुल केलेला आहे.तसेच ३१४१ लोकावर ३६३ गुन्हे दखल करून सदर गुन्हयात २१९ वाहने जप्त केली होती.सांगोला पोलीसाकडुन वेळोवेळी जनजागृती करून मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे असे सांगण्यात आलेले आहे.तरीही नियमाचे उल्लघंन करताना नागरीक दिसत आहेत.सांगोला पोलीस स्टेशनहददीत सांगोला शहरासह १०३ गावे आहेत.


या सर्वाना पुन्हा एखदा पोलीसकडुन आवाहन करण्यात येते की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे,बाजारपेठेत,कापड दुकानदार,चायनिज सेंटर, चहा टपरी, पानटपरी, हॉटेल,बिअरबार,परमिट रूम, मंगलकार्यालय,भाजी मंडई, मॉल्स, मेडीकल दुकान,किराणा दुकान, या ठिकाणी शासनाने दिलेल्या नियमाचे उल्लघंन केल्यास शहरातील किंवा ग्रामीण भागातील असेल त्यांचेवर कायदेशीर कडक कारवाई करीत आहोत. सदर कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक, श्री, भगवान निंबाळकर, सपोनि /यमगर, सपोनि /माने, सपोनि/हुले,पोसई/वसगडे,सपोफौ माळकोटगी,पोहेकॉ/८६१ खिलारे, पोहेकॉ/१६४० आप्पासो पवार, पोकॉ/ १५२३ कदम,पोका/१९८९ घुगे, पोकॉ/२१९५ शिंदे, चालक पोकॉ/२५३ लोटे अशी टिम तयार करण्यात आलेली असुन कोरोनाचे अनुषंगाने प्रशासनाकडुन लावण्यात आलेल्या नियमाचे उल्लघंन करणा-यावर कडक कारवाई करीत आहोत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन सांगोला तालुक्यातील सर्व नागरीकानी प्रशानाकडुन देण्यात आलेल्या सर्व नियमाचे पालन करावे अशी पुन्हा एखदा विनंती करीत आहोत.


(भगवान निंबाळकर) 


पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस

Post a Comment

0 Comments