google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील अंगणवाडी इमारतीचे नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी 73 लाखांचा निधी मंजूर : स्वातीताई कांबळे

Breaking News

सांगोला तालुक्यातील अंगणवाडी इमारतीचे नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी 73 लाखांचा निधी मंजूर : स्वातीताई कांबळे

 अंगणवाडी इमारतीचे नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी 73 लाखांचा निधी मंजूर : स्वातीताई कांबळे 


सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यात अंगणवाडीसाठी इमारत नवीन बांधकाम व अस्तित्वात असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर कडून 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली. सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेल्या निधीमधून सांगोला प्रकल्पातील संगेवाडी क्र.1, धायटी क्र. 2, कोळा प्रकल्पातील नाझरा 5 व पाचेगाव बु. 2 अशा एकूण 4 नवीन अंगणवाडी इमारतींसाठी प्रत्येकी 8.5 लाख रू. प्रमाणे एकूण 34 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सांगोला तालुक्यात सांगोला व कोळा अशा दोन प्रकल्पात अस्तित्वात असलेल्या 39 अंगणवाडी इमारतींची या निधीमधून दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महूद मेटकरवाडी क्र. 2, खिलारवाडी, गायगव्हाण, कटफळ, कटफळ शेरेवाडी, महिम, महिम चौगुलेवस्ती, खवासपूर, वाढेगाव, वाढेगाव दिघेवाडी, कमलापूर टाकळेमळा, शिवणे जानकरमळा, धायटी क्र. 1, संगेवाडी मेथवडे फाटा, मेथवडे माळीवस्ती, मांजरी, अकोला, अकोला खटकाळेवाडी क्र 2, वासुद बाबरमळा, एखतपूर नवलेनगर, अचकदाणी बेंदवस्ती, घेरडी क्र. 1 व पारे अशा 25 अंगणवाड्यांचा तर कोळा प्रकल्पातील जुनोनी काळूबाळूवाडी, किडबिसरी देवकातेवाडी, जुजारपूर गुनापावाडी, कोळा येसनखाडी, गौडवाडी गडदेवस्ती, बुद्धेहाळ कारंडेवाडी क्र. 1 नाझरा क्र. 2, नाझरा सरगरवाडी, अजनाळे लिगाडेवाडी, वाटंबरे दर्याबावस्ती, उदनवाडी करांडेवाडी, बलवडी शिंदेवस्ती, चोपडी चौगुलेमळा आणि बुरंगेवाडी क्र. 1 अशा 14 म्हणजेच सांगोला तालुक्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या सांगोला आणि कोळा या 2 प्रकल्पातील एकूण 39 अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती या निधीमधून करण्यात येणार आहे. सांगोला तालुक्यात नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम तसेच अस्तित्वात असलेल्या अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर अंगणवाडी नवीन इमारतींचे बांधकाम आणि अस्तित्वात असलेल्या अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील सांगोला आणि कोळा अशा दोन प्रकल्पातील अंगणवाड्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढील काळातही मा. आम. दिपकआबांच्या माध्यमातून तालुक्यातील अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार असल्याचेही शेवटी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई कांबळे यांनी स्पष्ट केले

Post a Comment

0 Comments