google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तहसील परिसरातील जुन्या पोलीस स्टेशनमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय व्हावे : नागरिकांची मागणी

Breaking News

तहसील परिसरातील जुन्या पोलीस स्टेशनमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय व्हावे : नागरिकांची मागणी

 सांगोला तालुक्यातील अवैद्य देशी दारू , हातभट्टी यांसारख्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभाग सुरू केला आहे परंतु सांगोला तालुक्यांमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कोठे आहे हेच नागरिकांना माहित नाही . यामुळे सामान्य नागरिक अवैध दारू विक्री च्या विरोधात तक्रार करणार कोठे ? असा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा ठाकला आहे .


सांगोला पोलीस स्टेशनकडे अवैद्य दारू विक्री बंद करण्यात संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल करा असे सांगितले जाते . उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे चिंचोली रोडला असल्याने सामान्य नागरिकांना पत्ता शोधण्यास अडचण निर्माण होत आहेत.यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे तहसील कार्यालय परिसरातील जुन्या पोलीस स्टेशनमध्ये व्हावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे . तालुक्यामध्ये अनेक ढाब्यांमध्ये , खानावळीमध्ये व गावांमध्ये अवैद्य देशी दारूची , हातभट्टीची विक्री केली जाते . अशा प्रकारचा अवैद्य धंद्यांला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे परंतुसध्या कोरोना महामारी मुळे शासनाची तिजोरी रिकामी झाली आहे असे शासनाकडून सांगितले जाते परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे शहराबाहेर असून ते खाजगी जागेमध्ये आहे तर या जागेचे भाडे भरण्यासाठी शासनाकडे पैसे येतात तरी कुठून ? सांगोल्यात उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय कोठे आहे हे सामान्य नागरिकांना माहिती नाही . यामुळे कारवाई करणारे अधिकारी अर्थपूर्ण वाटाघाटी करून अवैद्य धंदे करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे . उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय तहसील कार्यालय परिसरातील जुन्या पोलीस स्टेशनमध्ये , अशा मोक्याच्या ठिकाणी झाल्याने कामकाज सुरळीत चालण्यासाठी मदत होईल , सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होऊन तालुक्यातील अवैद्य दारू विक्री बंदीच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी वेग येईल . प्रशासनाचे अधिकाऱ्यांवर लक्ष राहील व प्रशासनाचा खर्च कमी होईल . यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय तहसील कार्यालय परिसरातील जुन्या पोलीस स्टेशन मधील डिबीच्या रूम प्रस्थापित करावे अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे .

Post a Comment

0 Comments