google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामसेवकांनी दररोज किमान १० मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी

Breaking News

ग्रामसेवकांनी दररोज किमान १० मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी

 ग्रामीण भागात सर्रास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लघंन होताना दिसून येत आहे . त्यामुळे ग्रामसेवकांनी दररोज किमान १० मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी .


आणि किमान ५ दुकानदारांना नोटीस देऊन दुकानात त्रिसुत्रीची अंमलबजावणी होते की नाही , याची तपासणी करावी , अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहे . गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे . सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती नित्रणात असली , ती भविष्यात पादविवाद नये , यासाठी खबरदारीघेण्यात आली . याबाबत स्वामी यांनी सोमवारी पत्र काढून ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले . सार्वजनिक ठिकाणी , मंगल कार्यालये , सांस्कृतिक सभागृह , मनोरंजन , बाग आदी ठिकाणी तपासणी पथकाद्वरि तपासणी करावी , संख्यात्मक निबंध , सामजिक अंतर , मास्कचा वापर आदी नियमांचे उल्लंघन होत असले , तर दंडात्मक कारवाई करा किंवा आवश्यकतेप्रमाणे आस्थापना बंद करा , असे आदेश देण्यात आले . बादती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोविड केअर सेंट . कोविड हॉस्पीटल ,कोविड केअर हॉस्पीटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध राहतील , सर्व उपकरणे सुस्थितीत असतील , याची खातरजमा करावी , शासकीय , निमशासकीय व सार्वजनिक ठिकाणी नो मास्क , नो एन्ट्रीचा अवलंब होतो की नाही , याची तपासणी करावी , भाजीवाले , दूध विक्रेत्यांनीही मास्कशिवाय फिरत नसल्याचे खात्री करावे , जनजागृती मोठ्या प्रमाणात करुन माझं गाव , कोरोनामुक्त गाव या अभियानाची अंमलबजवाणी करावी , गटशिक्षणाधिकाऱ्यांनी रोज ५ शाळा तपासून माहिती सादर करावी , गावागावात कोरोनाविषयी जनजागृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा चळवळ उभी करा , यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्याचे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments