google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाहीकारवाई निश्‍चित :उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील

Breaking News

सावधान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाहीकारवाई निश्‍चित :उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील

 चुकीचे काम केले तर कारवाई निश्‍चित : उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली झाल्याने नंतर या पदावर नव्याने नियुक्त झालेल्या राजश्री पाटील यांनी आज पदभार घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या मंगळवेढ्याचा नावलौकिक कायम ठेवताना एखाद्याने चुकीचे काम केले असेल तर गुन्हा दाखल होणारच आणि प्रकारचा गुन्हा होऊ नये यासाठी देखील प्रतिबंधात्मक प्रयत्न देखील केले जातील अशी ग्वाही उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिली. 


उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली झाल्याने नंतर या पदावर नव्याने नियुक्त झालेल्या राजश्री पाटील यांनी आज पदभार घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी बोलताना म्हणाल्या की शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच अडचणींचे निराकरण तत्परतेने केली जाईल. शहरांमध्ये जड वाहतुकीच्या संदर्भात रस्त्याचे नेटवर्क कसे आहे याची माहिती घेऊन त्यावर योग्य ते उपाय योजना करण्यात येतील.शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही सुरू करण्याच्या संदर्भात व नवीन उपविभागीय कार्यालयातील अर्धवट असलेले फर्निचरचे काम करून सदरच्या नवीन जागेत स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  आठवडा बाजार देशी रस्त्यावरील होत असलेल्या अडथळ्याबाबत विचारले असता शिवप्रेमी चौकात दर सोमवारी आठवडा बाजारात दिवशी दुचाकी वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने लावल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी व बाजारात खिशे कापूना रोखण्यासाठी दिवसभर पोलीसची नियुक्तीचा निर्णय घेतला जाईल. या बाबत पोलीस स्टेशनची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. वाळूचे लिलाव बंद असताना मध्यरात्री होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस व महसूल यांच्या वतीने संयुक्त कारवाई केली जाईल. कारागृहातून आरोपी पळून जाण्याच्या घटनेच्या संदर्भात देखील उपाय योजना करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments