google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात पून्हा 14मार्च पर्यत रात्रीची संचारबंदी लागू; यात्रा,उरूस,उत्सव,वारी यावर बंदी...

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात पून्हा 14मार्च पर्यत रात्रीची संचारबंदी लागू; यात्रा,उरूस,उत्सव,वारी यावर बंदी...

 सोलापूर जिल्ह्यात पून्हा 14मार्च पर्यत रात्रीची संचारबंदी लागू; यात्रा,उरूस,उत्सव,वारी यावर बंदी...महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पून्हा कोविड१९ विषाणूने बांधित झालेल्याची संख्या वाढत होत आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यात ही वाढ होण्याची शक्यता कारता येत नाही


.त्यामुळे त्यास प्रतिबंध घालण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शभरकर यांनी खालील आदेश लागू केले.सोलापुरात 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी लागू केली होती.आता त्यामध्ये वाढ करून ८ मार्च ते 14 मार्च पर्यत वाढवण्यात आली आहे.

 मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सालापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय हे 14 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार मात्र सुरू राहतील.

क्रिडांगणावर 14मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे.लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा ही कायम ठेवण्यात आली आहे.

कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.यात्रा ,उत्सव,उरूस,वारी यावरही बंदी घालण्यात आली आहे.सार्वजनिक गर्दीच्या विनामास्क फिरणाऱ्यास १००० रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments