google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली ;

Breaking News

सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली ;

 सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली ; रविवारी तिघांना कोरोनाची लागण !सांगोला  शहर आणि तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे . शनिवारी २ तर काल रविवारी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे .


यामुळे पुन्हा सांगोला तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्याचे समोर येत आहे .यावर संबंधित तालुका प्रशासन लवकरच ॲक्शन मुडवर येणार असल्याचे समजत आहेत . राज्यासह सांगोला तालुक्यात कोरोना वरील लस उपलब्ध झाली असली तरी रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस पुन्हा वाढ होताना दिसत आहे . यामुळे प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे . तालुक्यात मास्क , सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्यानंतरही रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने काळाची घेणे गरज बनले आहे . एकीकडे कोरोना लस दिली जात आहे तर दुसरीकडे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे . यामुळे नागरिकांसाठी ठरवण्यात आलेली वयोमर्यादा हटवून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी याबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत .

Post a Comment

0 Comments