ऑनलाईन प्रणालीमुळे विविध दाखले तातडीने मिळतील असे म्हटले जात असताना आता हीच प्रणाली विद्यार्थी , पालकांसाठी डोकेदुखीची ठरत आहे . अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होऊ लागली आहे .
परिणामी , संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हे के खोरपणामुळेच अणद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून पालकवर्गामधून व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे . विद्यार्थी व नागरिक मध्यस्थींच्या जाळ्यात अडकू नये किंवा त्यांची फसवणूक होऊ नये . त्यांनी चांगली सुविधा मिळावी , या उद्देशाने विविध दाखले , प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यात आले आहे . वरवर ही अतिशय चांगली यंत्रणा वाटते . परंतु वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पालक व विद्यार्थी खाजगीत सांगत आहेत . सांगोला तालुक्यात सेतूबाबत संबंधीत विभागाच्याअधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा आढावा घेण्यात येत नाही . त्यामुळे सर्व सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा आहे . तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचे नुकसान न करता विद्यार्थ्यांनी मागणी केलेले दाखले लवकरात लवकर द्यावेत , अशी मागणी होत कामकाजाची प्रक्रिया सहज सुलभ व्हावी या उद्देशाने हे केंद्र आहे . मात्र , या केंद्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा परस्परांमध्ये समन्वय नसल्याने व देण्यात येणारी प्रमाणपत्रे ही मध्यस्थींच्या माध्यमातून दिली जात असल्याने याचा मोठा फटका विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागतो . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते . याच संधीचा फायदा कार्यालयात बसलेली मंडळी उठवितात . प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा चौपट वपाचपट रक्कम घेऊन ही प्रमाणपत्रे वितरित होत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे . तहसील परिसराला मध्यस्थी करणाऱ्या लोकांनी घेरले आहे . सामान्य विद्यार्थ्यांना थेट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . परिणामी हे विद्यार्थी मजबुरीमुळे मध्यस्थींचा आधार घेतात व मध्यस्थी त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करतात . यामुळे सामान्य विद्यार्थ्यांची मोठी लूट होत आहे . या मध्यस्थींची तहसील परिसरातून हकालपट्टी करावी , अशी मागणी विद्यार्थी वर्गांमधून जोर धरु लागली आहे . दरम्यान , सेतू सुविधा केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे . याकडे संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे .


0 Comments