सांगोला तालुक्यातील जातीचे दाखले लवकरात लवकर देण्यात यावे- रविंद्र कांबळे
सांगोला प्रतिनिधी गेले अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यातील जातीचे दाखले प्रलंबित आहेत त्यामुळे हे जातीचे दाखले शासकीय सर्व बाबी तपासून व कागदपत्रे तपासून त्वरित देण्यात यावे अशी मागणी बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार रविंद्र कांबळे यांनी केलेले आहे अनेक दिवसापासून सांगोला तालुक्यातील जातीचे दाखले प्रलंबित आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी महत्वाचे आहे तसेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर बाबींसाठी तसेच नोकरीसाठी हे जातीचे दाखले आवश्यक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच सामान्य नागरिक यांना घरकुल योजनेसाठी यासह इतर योजनांसाठी हे दाखले महत्त्वाचे आहेत तसेच विविध महामंडळांच्या कर्ज प्रकरणासाठी व शासनाच्या योजनांसाठी या जातीच्या दाखल्याची आवश्यकता असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे सेतू कार्यालयाकडून होणारी प्रक्रिया पूर्ण झालेले आहे परंतु शासकीय कार्यालयांमध्ये हे दाखले प्रलंबित आहेत तरी प्रशासनाने जातीच्या दाखल्यांची सर्व कागदपत्रे व सर्व बाबी तपासून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर दाखले देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रवींद्र कांबळे यांनी केलेले आहे तरी प्रशासनाने त्वरित दाखले देण्याची मागणी सामान्य नागरिक का सह विद्यार्थी यांच्याकडून केले जात आहे


0 Comments