google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने

Breaking News

कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने

 कृषी पंपाचे वीजबील भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे : नगरसेवक आनंदा माने विजेच्या संदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी विज बिल भरणा करावा सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरातील कृषी पंपाचे वीजबील सुमारे 11 कोटी 90 लाख रू . थकीत असून नागरिकांनी योग्य सोयीसुविधेचा फायदा घेण्यासाठी हे वीज बिल भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे ,


असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांनी केले आहे . सांगोला शहरामध्ये एकूण 1513 शेती पंप वीज ग्राहक आहेत . या ग्राहकांचे वीज बिल सुमारे 11 कोटीग्राहकांचे वीज बिल सुमारे 11 कोटी 90 लाख रू . थकीत आहे . यामध्ये व्याज व दंड वजा मूळ थकबाकी निव्वळ 9 कोटी 08 लाख रू . आहे . यापैकी 30 ग्राहकांनी सुमारे 6 लाख 53 हजार रू . विजबिल भरल्यामुळे त्यांना जवळपास 5 लाख 73 हजार रू . सूट देण्यात आली आहे . यामुळे सांगोला शाखेस सुमारे 2 लाख 24 हजार रू . मंजूर झाले असून यामध्ये वीजेच्या संदर्भातील कामे मार्गी लावली जाणार आहेत . कृषी पंप वीज धोरण 2020 नुसार मार्च 2021-22 पर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांस 50 टक्के , मार्च 2023 पर्यंत 30 टक्के आणि मार्च 2024 पर्यंत बील भरणाऱ्या ग्राहकांस 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे . त्यामुळे या सुवर्णसंधी फायदा सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे असे ही सांगोला नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आनंंदा  माने यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments