सागोले : कोविड १ ९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला . त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत शहरातील पथ विक्रेत्यांना र.रु. १० हजारांचे खेळते भांडवल कर्ज पुरवठारूपाने बँकेकडून मिळणार आहे .
यामध्ये शहरातील भाजी , फळे , तयार खाद्य पदार्थ , चहा , भजीपाव , अंडी , कापड , चप्पल , उत्पादित वस्तू , रस्त्यावरील केशकर्तन , चर्मकार , पानपट्टीधारक इत्यादींना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जाणार आहे . राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे . पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत आज पर्यंत शहरातील २८७ पथ विक्रेत्यांनी ऑनलाईन विविध बँकेत - कर्ज मागणी अर्ज - सादर केलेले आहेत . प्राप्त २८७ अर्जापैकी २१८ प्रकरणे शहरातील विविध बँकांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत . या मंजूर - प्रकरणांपैकी१५७ पथ विक्रेत्यांच्या खात्यावर र.रु. १०००० / - प्रमाणे र.रु. १५ लाख ७० हजार एवढे कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे . उर्वरित मंजूर कर्ज प्रकरणे वितरीत होण्याच्य दृष्टीने श्री कैलास केंद्रे , मुख्याधिकारी , नगरपरिषद , सांगोला यांच्या मार्गदर्शनाखाली | शनिवार , दि . ०६ मार्च २०२१ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्ज वितरीण शिबिराचेआयोजन करण्यात आले . या शिबिरामध्ये पथ विक्रेत्यांना कागदपत्राची पूर्तता करण्याच्या दृष्टीने बँकत बोलविण्यात आले होते . सदर शिबिराच्या माध्यमातून १५ पथ विक्रेत्यांच्या खात्यावर र.रु. १०००० / - प्रमाणे निधी वितरीत करण्याची प्रक्रिया करण्यात आली . सदर शिबिर यशस्वी होण्याच्या दृष्टीने बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री . सुजीतकुमार व सांगोला नगरपरिषदेचे प्रतिनिधी श्री.योगेश गंगाधरे , सहा . प्रकल्प अधिकारी यांनी परिश्रम घेतले .


0 Comments