google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिवसाला देते ५ ते १२ लिटर दूध ; शेतकऱ्यांसाठी सरकारचा पुढाकार दुधाची राणी सानेन ' बकरी राज्यात

Breaking News

दिवसाला देते ५ ते १२ लिटर दूध ; शेतकऱ्यांसाठी सरकारचा पुढाकार दुधाची राणी सानेन ' बकरी राज्यात

 मुंबई , ता . २५ : बकरीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक असले तरी ती अर्धा लिटरपेक्षा कमी दूध देते . त्यामुळे बकरीच्या दूधाचा विक्रीच्या दृष्टीने विचार होत नाही . मात्र बकरीच्या दूधाला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असल्याने अधिक दूध देणाऱ्या सानेन जातीच्या बकऱ्यांना राज्यात आणले जाणार आहे .


सानेन जातीची बकरी दिवसाला ५ ते १२ लिटर दूध देते.बकरीच्यादूधापासून इतर पदार्थ तयार करुन शेतकऱ्यांना आर्थिक कमाईसाठी राज्य सरकार हा प्रयोग करणार आहे . युरोप मधून या बकऱ्या खरेदी | केल्या जातील . पशु , दुग्ध व मत्स्य विभागातंर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीमहाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे . सानेन जातीच्या बकरीचे मूळ स्वित्झर्लंड असून आता या बकऱ्या युरोप , अमेरिकेपासून अफगाणिस्तानातही शेतकरी मोठ्याप्रमाणात पाळतात . महामंडळातर्फे २० बकऱ्या आणि दोन बकरे खरेदी करण्यास पद्म विभागाने मंजुरी दिली आहे . राज्यात पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात विभागाच्या संशोधनासाठी या बकऱ्या ठेवल्याआहेत . वेगवेगळ्या हवामानात त्या कशा जुळवून घेतात याविषयीचा अभ्यास करून काही काळानंतर त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत . बकरीची किंमत दीड लाखांपासून सहा लाखांपर्यंत आहे . यासंदर्भात या पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थान , मथुरा येथे भेट देवून राज्य सरकार सानेन जातीच्या बकऱ्या तसेच बकऱ्यासंदर्भात इतर सुरू असलेल्या प्रयोगांची माहीती घेतली .

Post a Comment

0 Comments