google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ज्येष्ठांच्या अनुभवाचा मौलिक ठेवा वाढवावा व निरंतर सन्मान करावा : पो.नि. भगवानराव निंबाळकर

Breaking News

ज्येष्ठांच्या अनुभवाचा मौलिक ठेवा वाढवावा व निरंतर सन्मान करावा : पो.नि. भगवानराव निंबाळकर

 सांगोला / प्रतिनिधी : ज्येष्ठांकडे अनुभवाची शिदोरी असते . सर्वांनी त्या अनुभवाची नितांत गरज आहे . त्यांचे बोल पुढच्या तरुण पिढीला वाटचालीस निश्चित मौलिक आणि भक्कम साथ देणारे असतात . ज्येष्ठांच्या अनुभवाचा मौलिक ठेवा वाढवावा व त्यांचा निरंतर सन्मान करावा असे मत पो.नि. भगवानराव निंबाळकर यांनी व्यक्त केले .


सांगोला तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये तालुक्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . यावेळी पो . नि . भगवानराव निंबाळकर यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष रामदास भोसले गुरुजी व सेवानिवृत्त विस्ताराधिकारी बाबासो बिले तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत फोटो , शाल व साने गुरुजींचे पुस्तक देऊन सन्मान पूर्वक करण्यात आला . यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर म्हणाले , मी सुद्धा पूज्य साने गुरुजींच्या उपदेशाच्या विचाराचा आहे . मला ज्येष्ठ नागरिकांबाबत आपुलकी आहे . चर्चेवेळी ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सांगितल्या असता ते म्हणाले , आपण गटवार नागरिकांना बोलावून सोबत बसून त्यांच्या अडचणी विचारात घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . त्यांच्या उत्तर वयातील स्वस्त त्यांच्या काही तक्रारी असतील , आर्थिक प्रश्न असतील , समाजातील लोकांकडून विनाकारण त्रास होत असेल , स्वतःच्या मुला - सुने बाबत तक्रार असतील , आई - वडिलांना उतरत्या वयात साथ न देणे , देखभाल न करणे अशा वेळी ज्येष्ठांनी ज्येष्ठ संघटनेमार्फत तक्रारी अर्ज आमच्याकडे द्यावा . आम्ही त्या मुलांना किंवा इतरांना दंड , शिक्षा , अटक , कोर्टकचेरी असे न करता समजावून सांगून प्रश्न मार्गी लावू . आई - वडिलांचे पालनपोषण करणे मुलांचे कर्तव्य आहे . मुलाने समजूतदाराने न ऐकल्यास त्याला लगेच शासकीय कारवाई होऊ शकते . त्यामुळे आयुष्याची संध्याकाळ आई - वडिलांना आनंदी जाईल . त्यामुळे मुलांनी शेवटपर्यंत आशीर्वादाची शिदोरी मिळेल . तुम्ही तुमची अडचण न भीता सांगा , तुम्ही संघटनेला साथ द्या . मी निश्चित प्रतिसाद देईल . या सभेसाठी डॉ . मच्छिंद्र सोनलकर , डॉ . कृष्णा इंगोले , बजरंग गायकवाड , पवार सर , प्रभाकर कसबे गुरुजी , वाय . एस . बाबर , प्रभाकर चांदणे , डोंबे गुरुजी आदी सदस्य हजर होते . शेवटी रामदास भोसले गुरुजी यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले .

Post a Comment

0 Comments