सांगोल्याच्या आठवडा बाजारसाठी जनावरे घेवून येणाऱ्या वाहन चालकांची आर्थिक लूट करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी ; पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर !सांगोल्याच्या आठवडी बाजारासाठी जनावरे घेऊन येणार वाहन चालकाकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इंट्री गोळा करणाऱ्या पोलीस कर्मचारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणी चे निवेदन पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे
कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेला सांगोलचा रविवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाला आहे. या बाजारासाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर ,पुणे , अहमदनगर, व कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यातील अनेक नागरिक आपली जनावरे विक्री करण्यासाठी सांगोला येथे रविवारी भरणाऱ्या जनावराच्या आठवडा बाजारसाठी मिळेल त्या वाहनांमधून आपली जनावरे घेऊन येत असतात.परंतु सांगोला पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून सांगोला शहरात येणाऱ्या
मिरज,अकलूज, पंढरपूर, मंगळवेढा, जत रोडवर थांबून जनावरे भरून येणारी वाहने आडवून त्यांचेकडून पोलीस कर्मचारी किंवा नेमणूक केलेले झिरो कर्मचारी राजरोसपणे वाहनचालकांना दमदाटी करून हजारो रुपयांची इंट्री गोळा करत आहेत. व कोणत्याही प्रकारची शासकीय पावती वाहनचालकांना देत नाहीत .त्यामुळे जनावरे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना व वाहनचालकाला यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .त्यामुळे अशा बेकायदेशीर इंट्री गोळा करणाऱ्या सांगोला पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उमेश मंडले यांनी पोलीस अधिक्षक सो सोलापूर यांच्याकडे सादर केले आहे.



0 Comments