google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महानगरपालिका,नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी १० वी पासची अट लागू करावी ; सुरज बनसोडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी !

Breaking News

महानगरपालिका,नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी १० वी पासची अट लागू करावी ; सुरज बनसोडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी !

सांगोला :-महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या महा नगरपालिका व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकि साठी उमेदवारी आज दाखल करणाऱ्या किवा निवडणूक लढवू इच्छित असणाऱ्या उमेदवारी साठी किमान १० पास ची अट लागू करणे बाबत .  महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या महा नगरपालिका व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकि साठी उमेदवारी आर्ज दाखल करणाऱ्या किवा निवडणूक लढवू इच्छित असणारा उमेदवार हा किमान १० पास असावा , कारण स्थानिक स्वराज्य संस्था , महानगर पालिका , नगरपालिका ह्या शहरी हद्दीत असल्याने शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त होत आसतो .


सदर निधीचे नगर रचना आराखडा , सुधारित कर , नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधा या विषयी शासनाचे आलेले परिपत्रक ( GUIDE LINE ) हे समजून घेण्यासाठीकिमान वाचता येणे तेरी अत्यंत गरजेचे आहे . अशिक्षित निवडूण आलेले प्रतिनिधी यांना सदर योजनाच समजत नाहीत त्यामुळे अधिकारी व प्रतिनिधी यांचे मध्ये सदर बाबी वरून खटके उडतात . लोक प्रतिनिधी हा वेगळ्या अविर्भावात असल्याने त्यांना असे वाटते कि मी सांगेन टे काम झाले पाहिजे परंतु काही कामामध्ये तांत्रिक अडचणी असतात . म्हणून ते काम प्रशासकीय अधिकारी यांना करता येत नसते हे त्या अशिक्षित प्रतिनिधीच्या लक्षात येत नाही . त्यामुळे शहराचा विकास खुंटला जातो . मुदतीत शासनाच्या योजना मार्गी लागत नाही . त्यामुळे राज्यातहोणाऱ्या आगामी महापालिका व नगरपालिका या निवडणुकी मध्ये उमेवारी लढवू इच्छीनारा उमेदवार हा किमान १० वी पासच असावा नियम प्राधान्याने लागू करणेत यावा . हि नम्र विनंती . कळावे , आपला विश्वासू . सुरज दिवाकर बनसोडे नगरसेवक , सांगोलेनगरपरिषद सांगोले .

Post a Comment

0 Comments