सिंचन योजनेवर आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी आज ही पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभा करून बेरोजगारांच्या हाताला काम व शेतकरी शेतमजुरांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सौरऊर्जा प्रकल्प उभा करावा , अशी मागणी बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे .
महाराष्ट्राचा विचार करता सांगोला तालुक्यामध्ये वर्षातील बारा महिने सूर्यप्रकाश मोठया तीव्रतेने उपलब्ध होतो . उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून जर ऊर्जा निर्माण केली आणि ती ऊर्जा मान प्रदेशातील शेतकऱ्यांच्या शेतीला संजीवनी देणारा टेंभू उपसा सिचन योजनेच्या वीज वापराकरिता वापरली तर माणप्रदेशातील शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे उत्पन्न वाढणार आहे . तसेच आर्थिक बाबीमध्ये सुधारणेबरोबर दारिद्य संपूर्ण प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे . टेंभू जल उपसा सिचन योजनेच्या पाण्याचा आवर्तनांची संख्या वाढून हंगामी पिकांची शाश्वती निर्माण होईल . शेतकरी शेतमजूर जगला तर सरकार जगेल देश जगेल .पहिल्या टण्यामध्ये शासनाने सांगोल्यातील माळरानांचा वापर सौरऊर्जा प्रकल्पासाठी करून शेतकऱ्यांवर वीजदेयकाचा पडणारा बोजाकमी करावा पर्यायाने सरकारी भूमिका न्यायाची ठरणार आहे . सांगोल्यात सौरऊर्जा प्रकल्प झाला तर दुहेरी विकासाची फळे मिळणार आहेत . यामध्ये प्रादेशिक विषमता नष्ट होऊन समतोल साधला जाईल व दोन शेतीच्या पाण्याचा शाश्वत पर्याय उभा राहील . त्यामधून शेती विकास होईल लागवडीखालील क्षेत्र वाढेल मानव विकास निर्देशांक वाढण्यास मदत होईल आणी मागास तालुका विकसित होण्यास हातभार लागणार आहे . म्हणून सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये १८ ०० कोटी रुपये इतका निधी सौरऊर्जा प्रकल्पासाठी व सौर शेतकरी कृषी संजीवनी योजनेसाठी प्रस्तावित नियतव्यय आहे . त्यास अनुसरून जागतिक कामगार कल्याण युनियन ऑफ इंडिया , अखिल भारतीय होलार समाज संघटना व समविचारी संघटना तसेच माण प्रदेशातील तमाम शेतकरी शेतमजूर व हितचितक यांच्या वतीने प्रस्तावित सांगोला तालुका सौरऊर्जा प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येणार आहे . याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा पुढील ध्येय धोरण ठरवून लवकरच लोकचळवळीतून आंदोलन उभारण्यात येईल व सौर प्रकल्पांची घोषणा होईपर्यंत आंदोलन साखळी पद्धतीने सुरु ठेवू असे ही बापूसाहेब ठोकळे यांनी सांगितले आहे .


0 Comments