कोरोनाच्या कारवाईत सांगोला आघाडीवर, 20 हजार 687 नागरिक,व्यापारी तर 101 वाहनावर कारवाई , 30 लाखांहून अधिक दंड वसुल कोरोनाच्या कारवाईत सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका आघाडीवर
सांगोला शहर आणि तालुक्यात विना मास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणाऱ्या व कोरोना काळात दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आशा एकुण 20 हजार 687 नागरिक-व्यापारी तर 101 वाहनावर कारवाई करीत एकूण 30 लाख 01 हजार 850 रु. दंड वसुल केला आहे. 22 मार्च 2020 ते 10 मार्च 2021 दरम्यान पो.नि. भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतुक पोलिस लालासो कदम यांनी दिली आहे.मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूने राज्यासह सांगोला तालुक्यात थैमान घातले. सदर विषाणूला रोखण्यासाठी शासनाने अनेक नियम लागू केले. तसेच लॉक डाउन करण्यात आले. दरम्यान घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात येईल त्या प्रमाणे यामध्ये बदल करीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सांगोला पोलिस स्टेशन मार्फत सदरची कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यामध्ये पोलीस प्रशासनाकडून मास्क नसलेल्या 19 हजार 517 जणांवर कारवाई करत 27 लाख 30 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 306 जणांवर कारवाई करीत 61 हजार 200 रुपये दंड वसुल केला आहे. सोशल डिस्टन्स न पाळणे याबाबत 137 नागरिकांवर कारवाई करीत 13 हजार 700 रुपये इतका दंड वसुल केला आहे. संचार बंदी दरम्यान दुचाकीवर दोघांनी व तिघांनी प्रवास करणाऱ्या 558 जणांवर कारवाई करीत, 34 हजार 650 दंड वसूल केला आहे. निर्धारित वेळेनंतर दुकान सुरु ठेवणाऱ्या 54 व्यापाऱ्यांवर कारवाई करीत 54 हजार रुपये दंड वसुल केला आहे. चार चाकी वाहनातून 3 पेक्षा अधिक जनांनी प्रवास केला म्हणून 101 वाहनांवर कारवाई करीत 50 हजार 500 रुपये दंड वसुल केला आहे. शहर व तालुक्यातील व्यवसायिकांच्या दुकानात 5 पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यामुळे 115 दुकानावर कारवाई करीत 57 हजार 500 रुपये दंड वसुल केला आहे. असे एकुण मार्च 2020 ते आज अखेर 20 हजार 687 नागरिक-व्यापारी तर 101 वाहनावर कारवाई करीत एकूण 30 लाख 01 हजार 850 रु. दंड वसुल केला आहे.


0 Comments