google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात दंडात्मक कारवाईचा व्यापारी पेठेवर होतोय परिणाम

Breaking News

सांगोला तालुक्यात दंडात्मक कारवाईचा व्यापारी पेठेवर होतोय परिणाम

 सांगोला / प्रतिनिधी : करोना संसर्गचा पार्श्वभूमीवर सांगोला शहरात महसूल , पोलीस व नगरपरिषद विभागाच्या वतीने संयुक्तपणे दंडात्मक कारवाईची कारवाई जोमाने करीत आहे . याचा परिनाम शहरात येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली असून व्यापारावर परिणाम होत असल्याची चर्चा केली जात आहे .


ऐन मार्च महिन्यात विविध प्रकारचे कर , टॅक्स व बँकांची थकबाकीचा खर्च असल्याने दंडात्मक कारवाई जाचक ठरत असली तरी आता नेमका दोष कुणाला द्यायचा खरा प्रश्न आहे . सांगोला तालुक्यात करोना रुग्णावर अटकाव घालण्यात प्रशासन यशस्वी झाले असले तरी करोना संसर्गाचे नियम धाब्यावर बसवून आपले दैनंदिन कामकाज करणाऱ्या व्यापारी व नागरिकांना दंडात्मक कारवाईलासामोरे जावे लागत आहे . विना मास्क , धार्मिक व अन्य सामूहिक कार्यक्रमच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स न राखणे तसेच विना लायसन्स , ट्रिपल सीट , गाडीची कागदपत्रे इत्यादी कारणांनी ५०० रुपयांपर्यंतचा दंड नागरिकांना भरावा लागत आहे . याचा परिणाम शेतीच्या साहित्याची खरेदी , दुग्ध व्यवसाय व भाजीपाला व्यवसाय करणा - या सर्वसामान्य नागरिकांना दंडाची कारवाई महागात पडत आहे . तर किरकोळ परन्तु महत्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शाहरात येणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास होत असून दंडाची रक्कम भरणे अश्यक्य होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . शे - दोनशे रुपयांच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून १०० रुपयांचे पेट्रेल खर्चुन शहरात यायचे आणि ५०० रुपयाची दंडाची पावती फारडायची आता चांगलीच महागात पडत आहे . त्यामुळेमागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागातून शहरात येणा - या नागरिकांची सांख्य कमी झाल्याचे जाणवत आहे . मात्र याच परिणाम लहान सहान व्यावसायिका बरोबरच मोठ्या व्यापाऱ्यांवर झालेला दिडून येत आहे . मार्च महिन्यात बँकांची वसुली , घरपट्टी , पाणीपट्टी , दुकान गळ्याचे भाडे , वीजबिल यामुळे त्रस्त झालेल्या व्यापारी व नागरिकांना प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईचा अप्रत्यक्ष फटका बसत असल्याचे दिसून येत आहे . ग्रामीण भागातून व वाड्यावस्त्यावरून शहरात येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारपेठेत खरेदी विक्रीवर याचा परिणाम होत असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे . तर नागरिकांनी देखील नियमांचे पालन करायला पाहिजे असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे , त्यामुळे दोष कुणाला द्यायचा हाच खरा प्रश्न आहे

Post a Comment

0 Comments