google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी सोलापूरात रडले चक्क झाड !’

Breaking News

अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी सोलापूरात रडले चक्क झाड !’

 अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी सोलापूरात रडले चक्क झाड !’ चमत्कार बघण्यासाठी महिलांनी केली तोबा गर्दी !झाड रडण्याची अफवा शहरभर पसरली, तर्कवितर्कांना आले उधान ‘अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी सोलापूरात रडले चक्क झाड !’ चमत्कार बघण्यासाठी महिलांनी केली तोबा गर्दी !झाड रडण्याची अफवा शहरभर पसरली, तर्कवितर्कांना आले उधान 


सोलापूर, दि. १३ शहरातील मध्यवर्ती आणि गर्दीच्या बाळीवेस परिसरात आज एका सत्तरवर्षीय झाडाच्या बुंद्यातून चक्क पाण्याच्या धारा लागल्याचं दिसून आले. तथापि हा चमत्कार असल्याचे सांगत शहरातील महिलांनी झाडाच्या ठिकाणी गर्दी केली होती.झाड चक्क रडत असल्याच्या अफवा पसरविण्याचा प्रकार यातून घडला. इतकेच काय तर, अमावस्या आणि शनिवारचा संदर्भ या घटनेशी लाऊन अफवा पसरविण्याचा प्रकार झाला.

साधारण सत्तर वर्षांच्या या झाडाच्या बुंद्यातून सकाळी आठ वाजल्यापासून पाण्याच्या धारा लागल्या, सुरूवातीला धारकांचा वेग मोठा होता, पुन्हा तो कमी कमी होत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ‘शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क’ ला सांगितले.

दरम्यान या घटनेविषयी वनस्पती तज्ञांनी आपले मत नोंदवले आहे. पाण्याच्या धारा लागण्याचा हा चमत्कार नाही तर ती एक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या झाडाच्या बुंध्यातून पाणी आले आहे ते झाड जुनाट झाले आहे, या झाडाच्या जलवाहिन्या रिकाम्या होऊन त्याद्वारे बाहेर पाणी येण्याचा प्रकार झाला आहे, अशीही माहिती वनस्पती तज्ञांनी सांगितली. झाडाच्या बुंध्यातून पाणी येणे हा चमत्कार वगैरे काही नसून ती एक नैसर्गिक प्रक्रिया असून यासंदर्भात अफवा पसरवू नये असंही तज्ञांनी मत व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments