सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचेकडून कडक निर्बंध ; सर्व आठवडे बाजार बंद ; दुकाने सकाळी ७ ते सायं.७ या वेळेत उघडण्यास परवानगी !
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज सुधारित आदेश काढला आहे . सोलापूर शहरहद्द वगळून ग्रामीण भागासाठी हा आदेश काढला आहे .या आदेशातून जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला व फळे , किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे . जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू राहणार आहेत . सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात येणार आहेत . खाद्यगृह , परमिट रूम व बार फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून ५० टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे . होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे . जिम , व्यायाम शाळा , स्पोर्टस कॉम्प्लेक्स , खेळाची मैदाने हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत . सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील . धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही . जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे . एका दिवशी , एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे . बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक यांचेवर सोपविण्यात आली आहे
0 Comments