सांगोला सूतगिरणी शिवारात शॉर्टसर्किट,300 झाडांची झाली राख, अनर्थ टळला
सांगोला मिरज रोड वरील सांगोला शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित सांगोला यांच्या मालकीची एकूण 141 एक्कर जागा आहे. पैकी 35 एकर क्षेत्र हे महिला सूत गिरणी साठी राखीव ठेवण्यात आले आहे. सदर राखीव क्षेत्रापैकी बारा एकर क्षेत्रामध्ये जंगली झाडे, चिंच व गवत मोठ्या प्रमाणात उगवले होते. याच क्षेत्रामधून 33 केव्ही ची वीज वाहिनी आहे. काल गुरुवार दिनांक 25 रोजी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत जंगली सुमारे 250 तर चिंच 50 असे एकूण 300 झाडे होरपळून निघाली. तर या परिसरात असलेले गवत जळून खाक झाले. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने सदरची आग लवकर आटोक्यात आली नाही. परंतु सांगोला सूतगिरणी सांगोला नगरपालिका व रस्ता ठेकेदार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सदरची आग आटोक्यात आली. आग आटोक्यात येईपर्यंत सुमारे बारा एकर क्षेत्रावरील झाडे व गवत जळून खाक झाले होते.
आग लागल्याची बातमी समजताच सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच आग विझवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी योग्य भूमिका बजावल्याने पुढील नुकसान व अनर्थ टळला आहे.
0 Comments