google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मांसाहारी जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार !

Breaking News

मांसाहारी जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार !

 मांसाहारी जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार !मांसाहारी सोलापूर: जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पोलीस निरीक्षकाने आपणास बेदम मारहाण केल्याची तक्रार मेसचे डबे देणाऱ्याने केली आणि पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश मटणाच्या डब्यासाठी केली बेदम मारहाण !पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार  मांसाहारी जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पोलीस निरीक्षकाने आपणास बेदम मारहाण केल्याची तक्रार मेसचे डबे देणाऱ्याने केली असून पोलीस आयुक्त यांनी या तक्रारीची चौकशीही सुरु केली


आहे.पोलिसांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना आणि तक्रारी येत असतात आणि त्याची करणेही वेगवेगळी असतात. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या एका पोलीस निरीक्षकांच्या विरोधात मात्र वेगळीच तक्रार आली आहे आणि हा विषय चर्चेचाही बनला आहे. सोलापूरच्या बापुजीनगर येथील विजय रावसाहेब घोलप यांनी ही तक्रार दिली आहे. घोलप यांचा खानावळीचा व्यवसाय असून ते वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर यांना तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना जेवणाचे डबे पोहोचवतात. जेवणाचे डबे देण्यासाठी ते ग्रामीण पोलीस मुख्यालयात गेले होते. तेथून परत येताना एका पोलीस निरीक्षकांनी त्यांना अडवले आणि 'माझ्यासाठी मांसाहारी जेवणाचा डबा का आणला नाही' ? असे त्यांनी आपणास विचारत, मागील पैशाचा विषय काढून बेदम मारहाण केली. अशी तक्रार घोलप यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. आपणास आणि आपल्या कुटुंबाला या अधिकाऱ्यापासून धोका असून ते पदाचा गैरवापर करीत आहेत. मारहाण केल्याबाबत कोठे वाच्यता केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही या पोलीस निरीक्षकाने दिली असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले असून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपयुक्त दीपाली धाटे यांना दिले आहेत. घोलप यांनी ही तक्रार केल्यानंतर पोलिसांसह नागरीकातही हा विषय चर्चेचा बनला आहे.

Post a Comment

0 Comments