सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : चोरी , दरोडा , सरकारी कामात अडथळा , सरकारी मालमत्तेचे नुकसान , सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण मारामारी , रात्रीच्या वेळी चोरीच्या उददेशाने संशयीतरित्या फिरणे , महिलांची छेडछाड करणे , विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार कुमार आनंदा मेटकरी वय २५ रा.मेटकरीवस्ती , सांगोला यास एक वर्षासाठी सोलापूर व सांगली जिल्ह्यातून तडीपार केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पदभार घेतल्यानंतर चोरी , मारामारी , छेडछाड , अवैध वाळू , जुगार , मटका , गुटखा , अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कडक कारवाई करून त्यांना तडीपार करणार असल्याचा इशारा दिला होता . तसेच गावोगावी फलक लावून गुंडाना सावधानतेचा सावधानतेचा इशारा देण्यात आला होता . सांगोला पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार कुमार आनंदाकरणे , मेटकरी वय २५ रा.मेटकरी वस्ती सांगोला ता.सांगोला याच्यावर चोरी , दरोडा , सरकारी कामात अडथळा , सरकारी मालमत्तेचे नुकसान , सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण मारामारी , रात्रीच्या वेळी चोरीच्या उददेशाने संशयीतरित्या फिरणे , महिलांची छेडछाड करणे , विनयभंग असे गुन्हे दाखल होते . त्यास सांगोला पोलीस ठाणे हद्दीत ठेवल्यास आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याने व लोकांच्या जिवीतास धोका असल्याने त्याचा तडीपारीचा प्रस्ताव परीविक्षाधिन सहा . जिल्हादंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सांगोलाचे अंकीत यांच्याकडे पाठविण्यात आला होता . अंकीत यांनी शहानिशा करून त्यास एक वर्षासाठी सोलापुर व सांगली अशा दोन जिल्हयातुन तडीपारीचे आदेश पारीत केले आहेत . सांगोला पोलीसांनी कुमार मेटकरी यास ताब्यात घेऊन त्यास सांगली व सोलापुर जिल्हयातुन तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली .


0 Comments