विज्ञान महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
. . विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साहेबराव जुदळे नियोजित समितीचे चेअरमन प्रा दीपक रिटे प्रा धैर्यशील भंडारे प्रा कांबळे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पा सर अर्पण करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले महापुरुषांच्या जयंती साजरी करण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट करताना प्रा दीपक रिटे यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी म्हणाले की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व थोर नेते होते त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्रमंत्री वित्तमंत्री ही अनेक पदे समर्थपणे व यशस्वीपणे सांभाळली यशवंतराव चव्हाण ब्राह्मणेतर चळवळीपासून अलिप्त राहिले व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले त्यांच्यावर म गांधी प नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी कठोर अशा टीकेला तोंड द्यावे लागले प नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांच्या हातात ठेवला यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना फुले शाहू महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा वारसा चालू ठेवला त्यांनी स्पष्ट केले की हे राज्य मराठ्यांचे नाही तर मराठी माणसांचे आहे त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून पी केंद्रीकरणाला चालना दिली सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येऊन आपल्या उत्तुंग कर्तुत्वाने हिमालयाची उंची गाठलेली व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात प्रगतिशील करण्यासाठी जो पाया तयार केला तो अतुलनीय आहे तेव्हा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व सामाजिक राजकीय जीवनात कार्य करणाऱ्या या व्यक्तीने घ्यावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला तेव्हा अशा महान आदर्शवादी व्यक्तीला त्रिवार अभिवादन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कांबळे सर यांनी केले तर आभार प्रा धैर्यशील भंडारे यांनी मानले प्रा संभाजीराव शिंदे प्रा मारुती हाके स्वप्नील शिंदे गाडे सर विमलताई माने भजनावळे काका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्ट्रक्शन ठेवून पार पाडण्यात आला


0 Comments