google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पालकांनो मुलांची काळजी घ्या! जेवताना श्‍वसननलिकेत घास अडकून बालकाचा मृत्यू

Breaking News

पालकांनो मुलांची काळजी घ्या! जेवताना श्‍वसननलिकेत घास अडकून बालकाचा मृत्यू

 पालकांनो मुलांची काळजी घ्या! जेवताना श्‍वसननलिकेत घास अडकून बालकाचा मृत्यू


जेवताना अन्‍नाचा घास श्‍वसननलिकेत गेल्याने लहान मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी वडाचीवाडी (ता. माढा) येथे घडली.रोहन सिद्धेश्‍वर निळे (वय 11) असे मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे.माढा ग्रामीण रुग्णालयात रोहन यास गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दाखल केलेे होते.वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस यांनी रोहनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. रोहनच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहन दिव्यांग होता. त्याला झटकेही येत होते.त्याने गुरुवारी दुपारी साबुदाणा खाल्ला होता. जेवणानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते.त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची पोलिसांत नोंद झाली आहे.रोहन जेवण करताना त्याला ठसका लागल्याने अन्ननलिकेतील घास श्‍वसनलिकेत अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला, असे डॉ. व्हनकळस यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments