सांगोला शहर व तालुक्यात पूर्वी छुप्यारीतीने सुरू असलेले अवैध व्यवसाय आता नव्या जोमाने खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे . या व्यवसायास बारमाही मरण नसल्याने हळूहळू या व्यवसायास अधिकाऱ्यांकडून राजाश्रयही मिळत असल्याचे सांगोलावासीयांतून बोलले जात आहे . सांगोला शहर व तालुक्यात मटका , जुगार , वाळू चोरी , गुटखा या व्यवसायास गेल्या काही दिवसांपासून बरकत आल्याचे दिसून येत आहे
. याअगोदर हे अवैध व्यवसाय बंद होते , असे म्हणता येत नाही ; पण चोरी छुपे सुरू होतेच . पण , काही अधिकाऱ्यांचा वचक व दरारा होता . त्याला आतासारखा राजाश्रय मिळत नव्हता . गेल्या आठवड्यातपूर्वी सांगोला येथे सेवा केलेला कर्मचारी दोन दिवस सांगोला शहर व तालुक्यात आले व त्याने सर्व पंटरची गुप्त घेऊन नवीन सेटिंग लावून दिल्याची चर्चा आहे . यात वाढती महागाई , कोरोनामुळे व्यवसायास बसलेला मार तसेच वाढती रिस्क यामुळे आता बिदागी वाढवून द्यावी लागेल . या अटींवर परवानगीचे तोंडी लायसन्स दिल्याचे विश्वसनीय खबऱ्याकडून समजते . हे परवानगीचे लायसन्स | देताना वाळू व्यवसाय , मटका , गुटखा , वाहतूक अशी विभागणी केली आहे . गेल्या आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील | वसुलीबाबत वरिष्ठांना एकाचे दोन | | करून सांगितल्याने एकजण तणावात देवाघरी गेल्याची चर्चा होत होती . माण , कोरडा , अफुका , बेलवन या नद्यातून तसेच कोळे भागातील ओढ्यातून शेकडो वाहनांतून दररोज हजारो ब्रास वाळू तस्करी होते . महसूल व पोलिस प्रशासन काही ठिकाणी जुजबी कारवाई करीत असते . पण प्रयत्न अपुरे पडतात की डोळेझाक केली जाते ? हे गुलदस्त्यात आहे . गेल्या वर्षभरात महसूल प्रशासन व पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली होती . पण यातील अनेक वाहने गोडावून , एसटी डेपोतून प्रशासनास न जुमानता पळवून नेली आहेत . पळवून नेलेल्या वाहनांबाबत एक - दोन दिवस चर्चा होते . पुढे कागदी घोडे नाचवून | गुन्हा नोंद केला जातो . उपरोक्त काहीही | होत नाही . सांगोला बसआगारातून गुरुवार , ४ व ५ मार्च रोजी सलग एक ट्रक व टेम्पो वाळूमाफियांनी सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून | पळवून नेल्याची घटना घडली आहे . मागील महिन्यात ४ फेब्रुवारी रोजी कारवाई केलेला ट्रॅक्टर रात्री सव्वादहा वा . पळवून नेला . यावेळी ट्रॅक्टरनेबसस्थानकानजीकच्या ३ टपऱ्या व | दुचाकी उडवली , तर २ मार्च रोजी सकाळी ७ वा . वाळू वाहतूक करणाऱ्या बेफाम टेम्पोने एसटीला उडविले . अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्या आहेत . यावरून असे सिद्ध होते की अवैध व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक | जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे . सांगोला शहरातील कोणत्याही | रस्त्याने फेरफटका मारला तर सर्व रस्त्यावर वाळू पडल्याचे दिसून येते . | तरीही प्रशासनास जाग येत नाही , याचे | तालुकावासीयांना आश्चर्य वाटते .


0 Comments