सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडा-पुडांचं हादरलं विश्व ! गुन्हेगारी टोळ्या, प्रमुख आणि हस्तक यांची येरवडा कारागृहात निघणार ‘वरात’… मोक्कांतर्गत कारवाईसाठी गुंडांची शोध मोहिम…सोलापुरातील उफाळलेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ‘ॲक्शन मोडवर’
हुतात्मानगरी सोलापूरातील जनता नांदेल खऱ्या अर्थानं गुण्यागोविंदानं ! सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडा-पुडांचं हादरलं विश्व ! गुन्हेगारी टोळ्या, प्रमुख आणि हस्तक यांची येरवडा कारागृहात निघणार ‘वरात’… मोक्कांतर्गत कारवाईसाठी गुंडांची शोध मोहिम…सोलापुरातील उफाळलेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ‘ॲक्शन मोडवर’हुतात्मानगरी सोलापूरातील जनता नांदेल खऱ्या अर्थानं गुण्यागोविंदानं सोलापूर शहरातील गुन्हेगारी वर्तुळ आणि गुन्हेगारी संबंधातील सर्व प्रमुख, संबंधितजण यांना हादरवून सोडणारी ही शिवगर्जना न्यूज मराठीची विशेष बातमी आहे. सोलापुरातील गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या आणि गल्लीतील दादा,भाईजान, आण्णा, बाॅस आदीपासून ते संपूर्ण शहरावर दहशत असलेल्या गुंडा -पुडांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.
सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्यांचे नेते आणि संबंधितांवर मोक्कांतर्गत कारवाईचा फास आवळला जाणार आहे.या वृत्ताने त्यांच्यामध्ये जणूकाही भूकंपसारखा धक्का जाणवेल.
विशेष म्हणजे सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्यांवर ‘अंकुश’ आणण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांवर कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. ते यासंबंधीच्या ॲक्शन मोडवर आले आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा सोलापुरात हा पॅटर्न यशस्वीपणे राबला तर, सोलापुरातील समाजमन गुण्यागोविंदाने नांदू शकतं. त्याचबरोबर येथील कायदा आणि सुव्यवस्था कायम अबाधित राहणार आहे.
पोलीस आयुक्त शिंदे यांच्या बहाद्दर आणि धडाकेबाज त्याचबरोबर या धाडसी कारवाईचं तमाम सोलापूरकरांकडू स्वागत होईल,यामध्ये शंका राहत नाही.
सोलापुरातील गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या, त्यांचे प्रमुख आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने पाऊल टाकत असताना, पोलीस आयुक्त शिंदे यांनी सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीमधील सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांचे संबंधित यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.याद्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडे आल्यानंतर कारवाईचा पुढचा टप्पा राबला जाणार आहे. मोक्कांतर्गत कारवाई झाल्यानंतर सोलापूर शहर आणि परिसरातील गुंड – पुंड, गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि संबंधितजणांची वरात येरवडा कारागृहात निघणार आहे
अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे,सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या प्रमुखांवर मोक्कांतर्गत कारवाई करताना कोणत्याही आणि कसल्याही राजकीय हस्तक्षेपाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे भीक घालणार नाहीत हे वास्तव आहे, तसं त्यांनी बोलूनदेखील दाखवल्याचे कळते.
कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो हेच या कारवाई अंतर्गत दिसून येईल असे दिसते.
सोलापूरातील गुंडगिरी आणि दादागिरीचा बिमोड झाल्यास या शहरातील निकोप समाजमनाचं जे अधःपतन होत आहे ते रोखले जाणार आहे.
सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागात तसेच परिसरात अलिकडच्या काही वर्षात उफाळलेली गुन्हेगारी,दंबगिरी, गुंडागर्दी यांनं अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कित्येकाना यातून यमसदनी पोहचावं लागलं तर कित्येकजण हातबल झाले आहेत.
खाजगी सावकारीने तर सोलापूर शहर आणि परिसरात अक्षरश: कडेलोट केला आहे. खाजगी सावकारांच्या कारनाम्यातून लोकांना जगणे मुश्कील झाले आहे.
तथापि शहरात बोकाळलेली अवैध सावकारी मोडीत काढण्याचा ही अजंठा पोलीस आयुक्तांचा आहे. जीनं मुश्किल करणाऱ्या खाजगी सावकारांच्या नाड्या थंड करण्यासाठी पोलीस आयुक्त शिंदे यांच्याकडून मोहीम राबवली जाणार आहे.


0 Comments