google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लैंगिक क्षमतेसाठी गाढवाची तस्करी राज्यातील पशुगणनेनुसार गाढवाच्या संख्येत विक्रमी घट

Breaking News

लैंगिक क्षमतेसाठी गाढवाची तस्करी राज्यातील पशुगणनेनुसार गाढवाच्या संख्येत विक्रमी घट

 नाशिक / अतुल भांबेरे : गाढवाचे मांस खाल्ल्याने लैंगिक क्षमता वाढत असल्याच्या अफवेमुळे गाढवांची तस्करी होत असल्याची जोरदार चर्चा आहे . राज्यात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असून , गेल्या पाच वर्षांत एकट्या नाशिक जिल्ह्यात एक हजाराहून अधिक गाढवे कमी झाल्याची बाब पशुगणना अहवालातून समोर आली आहे .


ओझी वाहण्यासाठी वापरला जाणारा गाढव हा प्राणी दिसायला कुरूप असल्याने नेहमीच थट्टेचा विषय ठरतो ; पण या प्राण्याला जगातील सर्वात शांत , संयमी आणि मेहनती प्राणी म्हटल्यास वावगे ठरणार नाही . गाढविणीचे दूध हे आरोग्यासाठी पोषक असते , असे सांगितले जाते . तरीही त्याचा वापर कठीण असल्याने त्याचा सर्रास उपयोग केला जात नाही . त्यातच आता लैंगिक क्षमता वाढण्यासाठी गाढवांची कत्तल करून त्याचे मांस खाल्ले जात असल्याची धक्कादायक चर्चा आहे . त्यासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून गाढवांची तस्करी केली जात असल्याचे   बोलले जाते . बारामती , अमरावती , कोल्हापूर या ठिकाणी गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटनाही उघडकीस आल्याचे समजते . आंध्र प्रदेशच्या कृष्णा , गुंटूर , प्रकाशम् , कुर्नूल , पूर्व गोदावरी , पश्चिम गोदावरी , विशाखापट्टणम् , श्रीकाकुलम् आणि विजयनगर या जिल्ह्यांमध्ये गाढवाचे मांस आणि दुधाची मागणी वाढली आहे . आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्र , राजस्थान , उत्तर प्रदेश , तामिळनाडू आणि कर्नाटकच्या तुलनेत कमी गाढवे आहेत . त्यामुळे त्यांची तस्करी होत असल्याची चर्चा आहे . न तेथे एका गाढवाची किंमत १५ ते २० हजार रुपये आहे . ही गाढवे शेजारच्या राज्यातून आणून इथे विकली जातात अशी चर्चा आहे .

Post a Comment

0 Comments