google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना नियमांना शासकीय कार्यालयातच ठेंगा

Breaking News

कोरोना नियमांना शासकीय कार्यालयातच ठेंगा

 सांगोला ( प्रतिनिधी ) : प्रशासनाच्यावतीने लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे . मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लघंन होत असल्याचीचित्र सध्या दिसून येत आहे .


सरकारी कार्यालयात गेले असता नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितली जाते परंतू सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच कोरोना विषयाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील शासकीय कार्यालयात दिसून येत असल्यामुळे कोरोना नियमांना शासकीय कार्यालयतच ठेंगा मिळत असल्याचे दिसून येत आहे . गेल्या दोनच दिवसापूर्वी सांगोला तालुक्यातील महसूल विभाग , स्टेशन व नगरपालिकेच्या मार्फत संयुक्तरित्या कोरोनाविषयी जागृती करुन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली . याबद्दल शहर व परिसरातून कारवाईचे कौतुक करण्यात आले . परंतु कार्यालयातच कोरोनाच्या नियमांची अंमलबाजवणी होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे . त्यामुळे नागरिकांना वेगळे नियम आणि शासकीय कर्मचा - यांना वेगळे नियम आहेत का ? असे नागरिक खाजगीत बोलून दाखवित आहेत . त्यामुळे संबंधीत विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना नियम पाळण्याविषयी सूचना द्याव्यात , असे बोलले जात आहे .विनामास्क असलेल्यांना पकडल्यास सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवून दंड न भरता निघून जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे . विनामास्क कोणीही असो त्यावर कारवाई होणे अपेक्षीत आहे .

Post a Comment

0 Comments