सागोला तालुक्यामध्ये अवैध दारू व्यवसाय मोठ्या जोमाने चालू असून काल दि . ४ मार्च रोजी तालुक्यातील अनेक अवैध दारू दुकानांवर अकलूज व सांगोला उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संयुक्त धाड घालण्यात आली परंतु यामधील अनेक दुकानांमध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी करून प्रश्न मार्गी लावले असल्याबाबतच्या चर्चा सध्या तालुक्यात रंगू धरू लागल्या आहेत
. सांगोला तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला असून यामध्ये मटका , व्याज बट्टा , खाजगी सावकारकी , ऑनलाईन लकी ड्रे , वाळू व अवैध दारू यांचा समावेश होतो . तालुक्यामध्ये आतापर्यंत वरुणराजाची कृपादृष्टी नसल्याने शेती मध्ये फारसे उत्पादन निघत नव्हते . त्यामुळे तरुण वर्ग पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायाच्या मागे लागला असल्याचे दिसून येत आहे . हातामध्ये खेळता पैसा येत असल्याने दैनंदिन जीवनातील गरजा या आरामात भागविता येतात अवैध धंद्यामध्ये धोका असल्याने तरुणवर्ग अवैध धंदे .फॅशन म्हणून देखील करू लागला आहे . इतर अवैध धंद्यांच्या तुलनेत अवैध दारू या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर देशाचे होणारे नुकसान म्हणजे बौद्धिक क्षमता चांगली असणारी तरुण पिढी दारूच्या व्यसनामुळे पूर्णतः बरबाद होऊ लागली आहे . दारूचे व्यसन हे तरुणांना धड जगूही देत नाही व मरून ही देत नाही . दारू व्यवसायामुळे फक्त कुटुंबातील व्यक्तीच नव्हे तर संबंधित व्यक्ती मुळे पूर्ण कुटुंब व त्या कुटुंबाचे भविष्यात देखील उध्वस्त होत असते . संबंधित दारू पिणारा व्यक्तीला नानाविध प्रकारचे आजार देखील जडू लागले आहेत . दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मान सन्मान , स्वाभिमान या प्रकारच्या गोष्टी मातीमोल होऊन दारू पिण्यासाठी कोणत्याही प्रकारे जुगाड करून आपले व्यसन भागवले की संपले . कुटुंबाचा कसलाही विचार न करता दारू पिणारे लोक हे दारूचे दिवाने झाले असल्याने दारू व्यवसाय हा सर्वात मोठा घातक धंदा आहे . सांगोला शहर व तालुक्यात ठिकठिकाणी दारू व्यवसायिकांनी अगदी मंदिर उभा केल्यासारखे थाटामाटात आपले व्यवसाय मांडले असून त्याठिकाणीजाणारे लोक देखील पुण्यकर्म करण्यासाठी जात असल्यासारखे दिमाखात प्रवेश करतात . अनेक ठिकाणी तर दारू व्यवसायाची परवानगी नसताना देखील स्पष्टपणे मोठमोठाले मान्यताप्राप्त दारूचे दुकान , परमिट बिअर बार असे बोर्ड लावलेले दिसून येतात . भर चौकात व प्रमुख रस्त्यांवर दारूची दुकाने मंडळी आहेत . संबंधित व्यवसायास परवानगी आहे की नाही हे उत्पादन शुल्क विभागालाच ठाऊक असल्याने तालुक्यात अधून - मधून झोपेतून उठल्या सारखे दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी पडतात . काल ४ मार्च व ५ मार्च रोजी अकलूज व सांगोला उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सांगोला तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसायावर धाडी घातल्या असल्याचे समजले . व या धाडीमध्ये अनेक ठिकाणी अर्थपूर्ण वाटाघाडी करून प्रश्न मार्गी लावले असल्याच्या देखील चर्चा तालुक्यात उफाळू लागल्या आहेत . उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईबाबत रीतसर व परिपूर्ण माहिती भेटत नसल्याने सदरच्या चर्चेला खतपाणी दिल्यासारखेच चित्र दिसन येत आहे .


0 Comments