प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चेला उधाण ; लाभार्थी कडून होतेय लाचेची मागणी ; न.पा.प्रशासनाची भुमिका संशयास्पद !सांगोला शहराला १६०८ घरकुलाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात सांगोला नगरपालिकेला अपयश आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना न पा प्रशासनाच्या जाचक अटी मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हजारों रुपये खर्च करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणी सांगून त्यांच्याकडून न पा प्रशासनाचे काही कर्मचारी हजारों रुपयांच्या लाचेची मागणी करत आहेत. व पैसे द्यावे लागतीलच अन्यथा तुमचे घरकुल रद्द होईल असे सांगताना दिसत आहेत. गरिब लाभार्थी आपले घरकुल रद्द होईल या भितीने निमुटपणे या कर्मचा-यांच्या त्रास सहन करुन न पा कर्मचा-यांच्या मागणी प्रमाणे आर्थिक तडजोड करून आपल्या घरकुलाच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेत आहेत.सांगोला नगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेचे कामकाज पाहणाऱ्या काही कर्मचा-यांमुळे शासनाच्या या कल्याणकारी योजनेला खीळ बसली आहे. शहरातील नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याने गेल्या दोन वर्षात मोजक्याच घरकुलाचे कामपुर्ण झाले आहे. न पा प्रशासनाचे ज्या संतगतीने काम सुरू आहे. त्या गतीने या योजनेचे उद्दीष्ट पुर्ण होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागू शकतो.महसूल विभागाने सोलापूर जिल्ह्यातील वाळू चे लिलाव बंद केले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना वाळू साठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात. तात्कालिन सरकारने राज्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू देण्याची घोषणा केली होती. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या मोफत वाळू चा लाभ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत नाही.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मोफत वाळू मिळावी म्हणून अनेक पात्र लाभार्थी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.परंतु त्यांच्या मागणीला कुठेही यश मिळत नाही.गेल्या वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचे महाभयंकर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना कामे मिळत नाहीत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न दिवसोंदिवस कठीण होत चालला आहे. आश्या संकट काळात घरकुलासाठी पैस्याची जुळवाजुळव करणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे.या सर्व परिस्थिती तुन वाट काढून काही लाभार्थी आपल्याला मिळालेल्या घरकुलाचे काम करून घेण्यासाठी खटाटोप करत आहेत. परंतु त्यांना न पा प्रशासनाच्या काही कर्मचा-यांच्या गलथान कारभारामुळे नाहक आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा गोरगरिबांचे घराची स्वप्न साकार होणार नाही. शिवाय शासनाच्या या कल्याण कारी योजनेला खीळ बसेल.


0 Comments