सांगोला तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यालाच वन्यजीवाची माहिती नाही ; ६६ व्या वन्यजीवदिन तालुक्यात वन्यजीवांची तडफड ! सांगोला / नाना हालंगडे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या २०१३ च्या अधिवेशनात ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीवदिन म्हणून घोषित केला.यापूर्वी गेली ६५ वर्षापासून हा वन्यजीवदिन साजरा केला जातो .
आजचे ६६ वे वन्यजीवदिन आहे . वन्यजीव म्हणजे वनात , जंगलात राहणारे जीव प्राणी , वनस्पती , किटक , पक्षी , वृक्ष , आणि एकूणच सर्व जीवमात्रा जगभर ३ मार्च हा दिवस जागतीक वन्यजीव म्हणून साजरा केला जातो . सांगोला तालुक्यात मात्र शेकडो एकर वनपरिक्षेत्र असतानाही सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाला तालुक्यात किती वन्यजीव आहेत . याची माहिती नाही . हे विशेषच म्हणावे लागेल . सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार हा आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय असा अवस्थेमध्ये पहावयास मिळत आहे . वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यापासून ते वनमजुरापर्यंतचे सगळेच पगाराचे धनी आहेत . आज तालुक्यात वनपरिक्षेत्र उध्वस्त होण्याचा मार्गावर आहे . वनपाल , वनरक्षक यांना अधिकार कर्तव्याचे भान नाही . आपल्या बिटमध्ये किती वन्य प्राणी आहेत . किती वनविभाग आहे . कुठे वनविभागातील पाण्यासाठी पाणथळे आहेत . याची माहिती नाही . जुनीच कामे नव्याने करून वनकमीट्याबरोबरच वनपाल , वनरक्षक मालामाल झाले आहेत . वनमजुरही कामावरतीहजर राहत नाहीत . अशी ही सांगोला तालुक्यात विदारक स्थिती आहे . वनजीवाचे रक्षण , संवर्धन त्यांचे अन्नसाखळीतील महत्व , वन्यजीवाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आजची स्थिती या विषयावर अनेक गोष्टी बोलल्या व लिहल्या जातात . तरीपण वनविभाग असे दिन नावापुरतेच साजरे करतो . तालुक्यातील कार्यालयाला वन्यप्राणी , पक्षी , व कोणत्या परिक्षेत्रात किती पक्षी आहेत . याची माहिती नाही . सध्या तालुक्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत . वनपरिक्षेत्रातील झाडे , गवत सुकलेल्या अवस्थेत आहेत . अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांना पिण्यास पाणी नसल्यामुळे वनविभागाचे हे पानथळे निरूपयोग ठरत आहेत .प्रत्येक गावांमध्ये वनमजुरांच्या नेमणुका आहेत . पण त्यांनाही अधिकार कर्तव्याचे भान नाही . आजचा हा वनजीवदिन नावापुरताच साजरा होणार आहे . तालुकयात लांडगे , तरस , हरिण , कोल्हे , ससे , व अन्य वन्य प्राणी , पशु , पक्षी यांची संख्या मोठी आहे . पण वन्यजीव संवर्धनअभावी हे पशुपक्षी , प्राणी नामशेष होण्याचा मार्गावरती आहेत . असे हे वन्यजीवदिन साजरे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे


0 Comments