google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाळू माफियांनी महसूल पथकातील तलाठी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्कार्पिओ अंगावर घातली

Breaking News

वाळू माफियांनी महसूल पथकातील तलाठी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्कार्पिओ अंगावर घातली

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : कोरडा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू चोरी करून पळून जाणाऱ्या वाहनास पकडून तहसील कार्यालयाकडे कारवाई करण्यासाठी घेऊन येत असताना स्कार्पियो मधून आलेल्या वाळू माफियांनी महसूल पथकातील तलाठी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्कार्पिओ अंगावर घातली


. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला गेल्याने स्कापिओ उजव्या बाजुच्या घासून खाली पडल्याने खुब्यास दुखापत झाली . ही घटना मंगळवार २ मार्च रोजी सोनंद ता . सांगोला येथील झेडपी शाळेच्या पाठीमागे कोरड्या नदीपात्रात घडली . याबाबत , तलाठी प्रकाश पांडुरंग गायकवाड रा . कडलास ता . सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषी बाबर , योगेश बाबर , महिपती बोराडेसह एक अनोळखी इसम अशा चौघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केला आहे . तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या आदेशान्वये हातीदचे मंडलाधिकारी इंगोले , जवळा तलाठी संभाजी जाधव ,  घेरडीचे तलाठी कुमाररवी राजवाडे , बलवडीचे तलाठी दिनेश सोणूने , सोनंद तलाठी प्रकाश गायकवाड यांचे पथक मंगळवार २ रोजी पहाटे ४.४० ते स .६.३० च्या दरम्यान सोनंद गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे कोरडा नदीच्या पात्रामध्ये अवैद्य वाळू चोरीविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेले होते . त्याठिकाणी एक टेम्पो व ट्रॅक्टरमध्ये काही लोक अवैधरित्या वाळू भरून जाताना महसूल पथकाला पाहून पळून जात होते . त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबविण्यासाठी त्याच्या पाठीमागे गेले . तर टेम्पोचा पाठलाग करीत सोनंद ते औंढी रस्त्यावरील शिवाजीनगर पाटीजवळ तो पकडला असता चालक वाहन सोडून पळून  गेला . त्यावेळी पकडलेले वाहन पुढील  कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना सोनंद गावातील ऋषी सतीश  बाबर , योगेश सतीश बाबर , महिपती अभंगाबोराडेसह एक अनोळखी इसम एम.एच .४५ एन २७६५ या स्कार्पिओमधून आले . यावेळी ऋषी बाबर यांनी तलाठी प्रकाश गायकवाड यांना टेम्पोतून धरून खाली ओढून याला मारा असे इतर साथीदारांना भडकावून तलाठी प्रकाश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्कार्पिओ अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी सदर वाहनाची पुढील चाके तलाठी गायकवाड यांच्या उजव्या बाजूच्या खुब्याला घासून गेल्याने खुब्याजवळ जखम होऊन ते खाली पडले . त्यावेळी चौघांपैकी तिघेजण स्कार्पिओकार मधून तर योगेश बाबर हा लाल - पिवळ्या रंगाच्या ४०७ टेम्पोमध्ये अवैधरित्या चोरून भरलेल्या वाळूसह तेथून पळून गेला . याप्रकरणी तलाठी प्रकाश पांडुरंग गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषी बाबर , योगेश बाबर , महिपती बोराडेसह एक अनोळखी इसम अशा चौघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Post a Comment

0 Comments