लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सेनेचे धनाजी बाड तर उपसरपंचपदी स्वाती साठे यांची निवड.
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे धनाजी बाड तर उपसरपंच पदी शिवसेनेच्या स्वाती साठे यांची बिनविरोध निवड झाली. लक्ष्मीनगर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती.आमदार शहाजी बापू पाटील,माजी आमदार दिपक साळुंखे पाटील,काँग्रेसचे पी सी झपके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली होती.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ला सहा तर शेकापला तीन जागा मिळाल्या आहेत.आमदार शहाजी बापू पाटील,दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येत्या पाच वर्षात गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नूतन सरपंच धनाजी बाड, आणि नूतन उपसरपंच स्वाती साठे यांनी सांगितले. या वेळी सेनेचे पॅनेल प्रमुख यशवंत नरळे,माजी सरपंच धनाजी नरळे,माजी उपसरपंच भगवान साठे, सचिन बाड,सुधीर गोडसे,सुब्राव साठे,गोवर्धन दाजी गोडसे,धर्मराज गोडसे,संजय गोडसे,निरंजन साठे,पांडुरंग गोडसे,दरयापा नरळे,विश्वनाथ लोखंडे,दत्ता बाड, सिद्धेश्वर करांडे,दिपक बाड (सर)शहाजी हेगडे,तुकाराम साठे,सोमनाथ गोडसे,सुनिल साठे,तानाजी बाड, पिंटू बोडरे,आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य दरीअप्पा खिलारे,सविता नरळे,मंदाकिनी गोडसे,धर्मराज ऐवळे,आदींचा सत्कार करण्यात आला.


0 Comments