google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विभक्त राहत असलेल्या पत्नीने आल्याआल्याच केला पतीचा खून – आठ वर्षाआधी केला होता प्रेमविवाह

Breaking News

विभक्त राहत असलेल्या पत्नीने आल्याआल्याच केला पतीचा खून – आठ वर्षाआधी केला होता प्रेमविवाह

 विभक्त राहत असलेल्या पत्नीने आल्याआल्याच केला पतीचा खून – आठ वर्षाआधी केला होता प्रेमविवाह

नालासोपारा – आठ वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता.पण तो दारू पिऊन मारहाण करीत असल्याने ती त्याला सोडुन विभक्त राहत होती. त्यांना एक सात वर्षाचा मुलगा देखील आहे.पण  जवळपास दिन महिन्या आधी ती पून्हा नवऱ्याकडे राहायला आली होती.ओण तिने त्याचा सुरा भोसकून खून केल्याचे समोर  आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार लोकेश जगदीश पवार आणि नेहा यांचा ८ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक ७ वर्षांचा मुलगा देखील आहे.लोकेश जगदीश पवार याला  दारूचे व्यसन असल्याने तो दारू पिऊन नेहाला मारहाण करायचा. लोकेश च्या मारहाणीला कंटाळून नेहा लोकेश पासून विभक्त झाली होती. पण पुन्हा त्यांच्यात जुळून आल्याने दोन महिन्यांपूर्वी तिने लोकेश सोबत राहायला सुरवात केली होती.घटनेच्या दिवशी लोकेश पुन्हा दारू पिऊन आला असावा आणि त्यांच्यात वाद झाल्याने नेहा ने त्याच्या पोटात सुरा भोसकून त्याचा खून केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या खुना मागे कौटुंबिक कलहच आहे की आणखी काही याचा तपास विरार पोलिसां कडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments