सांगोला:-ज्या शेतकऱ्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टल वर आपले नावनोंदणी व अर्ज केलेले नाहीत अशा सर्व शेतक - यांसाठी महाडीबीटी पोर्टल ची मुदत वाढ करण्यात आली असून महाडीबीटी पोर्टल पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर त्वरित नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी केले आहे .
डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असल्याने शासनाने कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली आहे . कृषी विषयक योजनांची माहिती करण्यासाठी आता शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून या मध्ये शेतकऱ्यांना कृषीच्या पूर्व योजनांची रीतसर माहिती मिळते . महाडीबीटी पोट लवर व नावनोंदणीसाठी शेतकन्यांना ७/१२ उतारा , ८ अ , बँक पासबुक व आधार कार्ड ची आवश्यकता भासणार आहे . या पोर्टलद्वारे शे तक न्यांना फलोत्पादन योजनेअंतर्गत कांदा चाळ , पॅक हाऊस , जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन , फळबागांना आकार देणे , फळबाग लागवड , मधुमक्षिका पालन , हरितगृह , शेडनेट , प्लास्टिक मल्चिंग या योजनांचा लाभ मिळणार असून , भाऊसाहेब | फुड कर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड , डाळिंब लागवड , मोसंबी लागवड , पेरू लागवड , सिताफळ तसेच इतर फळबाग लागवड या योजनांची व शेततळ्यातील पन्नी , सामूहिक शेततळे यांचा लाभ मिळणार आहे . कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत व पावर ट्रेलर चलित अवजारे , प्रक्रिया संच , पावर टिलर , बैलचलित अवजारे , चलित अवजारे व स्वयंचलित अवजारे , कल्टीवेटर , कापणी यंत्र , नांगर , पेरणी यंत्र , मल्चिंग यंत्र , मळणी यंत्र , रोटावेटर या अवजारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . सन २०२१- २२ सालासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी शासनाने महा डीबीटी पोर्टल वर अर्ज करण्यास पुन्हा एकदा संधी दिली असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महा - ई - सेवा केंद्र मध्ये जाऊन हाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावेत . शेतकन्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच , मागेल त्याला शेततळे , सामुदायिक शेततळे , फळबाग लागवड , कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर व इतर अवजारे या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे


0 Comments