google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र जाधव सरचिटणीस गणेश भुजबळ तर उपाध्यक्षपदी दिनेश सोनुने व अर्चना लोखंडे

Breaking News

सांगोला तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र जाधव सरचिटणीस गणेश भुजबळ तर उपाध्यक्षपदी दिनेश सोनुने व अर्चना लोखंडे

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुका तलाठी संघाची काल मंगळवार दि.९ मार्च रोजी बैठक संपन्न झाली . माजी अध्यक्ष भडगे भाऊसाहेब यांची बदली मंगळवेढा येथे झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड करणेत आली . सदरच्या निवडी जिल्हाध्यक्ष श्री पांडेकर भाऊसाहेब यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा संघटना सचिव विजापूरे भाऊसाहेब यांचे उपस्थिती निवड पार पडली .


नूतन अध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र अरुण जाधव यांची निवड करण्यात आली .सरचिटणीस म्हणून गणेश बाळासाहेब भुजबळ , सहचिटणीस म्हणून नारायण खरात , उपाध्यक्ष म्हणून दिनेश सोनुने व अर्चना लोखंडे यांची करण्यात आली . कार्याध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिंदे , खजिनदार म्हणून गणेश तन्मोर , हिशोब तपासणीस म्हणून दीपक शिंदे , संघटक म्हणून किरण बाडीवाले , सल्लागार म्हणून बाळासाहेब कदम यांची निवड करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे निमंत्रित सदस्य म्हणून वैशाली गायकवाड , माधुरी घाडगे , दिनेश बडंगे व बाळासाहेब कुंभार यांची निवड करण्यात आली आहे . सांगोला तालुका तलाठी संघाच्या नूतन पदाधिका - यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments