सांगोला तालुक्यातील अवैध वाळू वहातुक करताना पकडलेल्या वाहनांची पळवा - पळवी बनली चर्चेचा विषय तालुक्यातील ओढे आणि नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचोरी दिवसेंदिवस सुरूच असून वाळू चोरांची मुजोरी वाढत आहे . बेकायदेशीर वाळूचोरी करणारी वाहने जप्त करून ती आगारात,शासकीय गोदामात लावली जातात . परंतु ही वाहने पळवून नेण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत .
अवैध वाळूउपसा करणारी वाहने पकडल्यानंतर एसटी आगारात,शासकीय गोदामात लावली जातात.यात ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप , टमटम , टेम्पो,मोटारसायकल, बैलगाड्या या सारख्या वहानांचा समावेश असतो . गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वहातुक करताना पकडून जप्त केलेली वाहने एसटी डेपोचे गेट तोडून पळवून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . या अगोदरही एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेल्याने खळबळ उडाली होती . यात ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पळून गेला होता . यानंतरही पुन्हा अशा काहीघटना घडल्या आहेत . वाळू माफियांची वाढलेली मुजोरी आणि त्यांचे वाढलेले धाडस यामागे कोण आहे , याचा शोधघेणे गरजेचे आहे . वाळूचोरांकडून वाहने पळवापळवी प्रवाशी व कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगोल्यात वाळू चोरांची मुजोरी वाढली आहे.वाळू व्यवसाय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून नेहमीच ओळखला जातो माण , कोरडा , बेलवण व अफ्रुका यासारख्या नद्या अगोदरच वाळू चोरांनी खरडून मोकळ्या केल्या आहेत . गेल्यावर्षी महापुराचे पाणी आले आणि त्याबरोबर वाळूही आली . आता यावर वाळू माफियांचा डोळा आहे . महसूल व पोलीस विभाग यांनी समन्वय साधून अशा मुजोर - वाळू चोरांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे . सांगोला पोलिसांनी शहरात व गावागावात मस्ती केली तर सोडणार नाही , असे फलक लावले आहेत तरीही वाहने पळवून नेण्याच्या घटना होत आहेत .


0 Comments