अमरावती : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही वीजग्राहकांच्या सेवेतील महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, यापुढे वीज कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालर्यांमध्ये तोडफोड झाल्यास फौजदारी कारवाई होणार आहे फेब्रुवारी महिन्यात आर्थिक संकटामुळे नाइलाजाने महावितरणकडून थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे.
यादरम्यान त्यांना काही ग्राहकांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की किंवा मारहाणीचा सामना करावा लागतो.अनेक ठिकाणी नागरिकांकडून रोष व्यक्त करताना कार्यालयाची तोडफोड करून नुकसानसुद्धा केले जाते. भविष्यात असे प्रकार घडल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांना वरिष्ठांनी दिल्या. वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना प्रतिकुल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना तर दुसरीकडे वीजबिल वसुलीसाठी मारहाणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. शासकीय कामात अडथळा, अपशब्द वापरणे, धमकी, मारहाण, कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड, सरकारी मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत जमाव गोळा करणे आदी प्रकाराविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.एक फेब्रुवारीपासून वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात अमरावती शहर विभागात चार, ग्रामीणमध्ये सात, अचलपूर एक तर मोर्शी विभागात तीन ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.देयक भरण्यासाठी पर्याय -सद्यःस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. थकबाकीचा भरणा करण्यासाठी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना देयक भरण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे.लाखो ग्राहकांकडे थकीत परिमंडालातील 1 लाख 89 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी एप्रिलनंतर एकदाही वीजबिल न भरल्याने नाइलाजाने गेल्या एक फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली.


0 Comments