सांगोला शहरातील महादेव गल्ली येथील व ग्रामदैवत अंबिकादेवी मंदिर येथील मुख्य पुजारी दत्तात्रय धोंडीबा गुरव यांचे काल सोमवार दि .१ मार्च रोजी सकाळी ९ वाजणेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले .
निधनासमयी त्यांचे वय ५५ होते . दत्तात्रय गुरव हे अध्यात्माचे सखोल अभ्यासक होते . त्यांनी ग्रामस्थ व श्री अंबिकादेवी यात्रा कमिटीच्या मदतीने प्रयत्न करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केले होते . त्यांच्या जाण्याने अध्यात्म व धर्मकार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , २ मुले , २ मुली , सुन , जावई , नातवंडे असा परिवार आहे . त्यांचा तिसरा दिवस विधी कार्यक्रम उद्या बुधवार दि .३ मार्च रोजी रोजी सकाळी ७.३० वा . होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले .


0 Comments