सांगोला तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंचाच्या निवडी पार पडल्या . यामध्ये शेकाप ३० , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस २३ , भाजप १ , तर सात गावात आरक्षित असलेल्या जागी अनुसूचित जातीचे सरपंचपदाचे उमेदवार नसल्याने उपसरपंचपदाच्या निवडीपार पडल्या . या सर्व ठिकाणी शेकापचेच । उपसरपंच निवडून आले असल्याने एकूण ६१ पैकी ३७ ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व झाले आहे .
तालुक्यातील ६१ पैकी ७ सरपंचपद रिक्त राहिले असून उरलेल्या ५४ ग्रामपंचायतीमध्ये ४३ ठिकाणी महिला सरपंच निवडून आल्यामुळे तालुक्यात सरपंचपदाचे महिलाराज आले आहे . तालुक्यात गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला .तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण | दुसऱ्यांदा होऊनही काही गावात अनुसूचित जातीचे सदस्य नाहीत . तालुक्यात झालेल्या निवडीमध्ये सात गावांमध्ये आरक्षण सरपंचपदाचे उमेदवार नसल्याने याठिकाणी सरपंच निवडी झाल्या नाहीत . फक्त या निवडी घेण्यात आल्या . तालुक्यात आज सर्वात लक्षवेधक निवडणुकीत कोळे , महूद , नाझरे , जुनोनी , लोटेवाडी , अजनाळे , कमलापूर , उदनवाडी , मानेगाव , सोमेवाडी , बुद्धेहाळ , किडबिसरी , जुजारपूर , डोंगरगाव , घेरडी , बामणी , हटकर मंगेवाडी , वाकी शिवणे , नराळे , महिम , | कटफळ येथेशेकापचे उमेदवार निवडून आले . जवळा येथे राष्ट्रवादीचे सरपंच , उपसरपंच निवडून आले आहेत . हलदहिवडी , चोपडी ग्रामपंचायतीवर शिवसेना , राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रतिक्षा सिद्धार्थ गायकवाड यांचीसरपंचपदी , तर रुपाली समाधान लेंडवे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली . संगेवाडी येथे राष्ट्रवादीच्या नंदादेवी दामोदर वाघमारे यांची उपसरपंचपदी , तर राजू हरी खंडागळे यांची बिनविरोध निवडझाली.मांजरी ग्रामपंचायतीमध्ये | महाविकास आघाडीच्या शहनाज अमिन तांबोळी या बिनविरोध निवडून आल्या , तर उपसरपंचपदी शेतकरी विकास आघाडीच्या कौशल्या वसंत कांबळे या मतदानातून उपसरपंचपदी निवडून आल्या . त्यामुळे गावात सरपंच एका पॅनलचे तर उपसरपंच दुसऱ्या आघाडीचे असे चित्र आहे . महाविकास आघाडीनेहीअनेक गावात एकत्रित येत सरपंच , उपसरपंच मिळून मुसंडी मारली आहे . तालुक्यातील निजामपूर , खिलारवाडी , हनमंतगाव , तरंगेवाडी , आगलावेवाडी , बुरुंगेवाडी , भोपसेवाडी या गावचे सरपंचपद रिक्त राहिले आहे . तेथे सर्व ठिकाणी शेकापचे उपसरपंच निवडून आल्याने तेथे सरपंच शेकापचे निवडून येणार असल्याचे दिसून येते . तालुक्यातच ६१ ग्रामपंचायतीमधील सात गावचे रिक्त राहिलेले सरपंचपद वगळता राहिलेल्या ५४ गावांपैकी ४३ गावांमध्ये महिला सरपंच निवडून झाल्या आहेत .


0 Comments