सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरातील बँक ऑफ इंडिया शाखा सांगोलाच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या मोटार सायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये चोरुन नेल्याची घटना शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली . सदर चोरीबाबत भिमाशंकर लेंडवे यांनी सांगोला पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , मेडशिंगी ता.सांगोला भिमाशंकर लेंडवे हे बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला येथे नोकरीस आहेत.सुर्योदय अर्बन बँकेत १ लाख २५ हजार रुपये भरण्यासाठी मोटार सायकलच्या डिक्कीत रक्कम ठेवून व मोटार सायकल बँकेसमोर लावून मी बँकेत काम करत बसलो . दुपारी २ वाजता मित्र मोहन इंगोले यास २५ हजार रुपये दिले . त्यानंतर १ लाख रुपये डिक्कीत ठेवुन लॉक लावुन बँकेत गेलो . दुपारी ३.४५ वाजता सुर्योदय अर्बन बँकेत पैसे देण्याकरिताजायचे असल्याने बँकेतुन बाहेर आल्यानंतर मला मोटारसायकलचे डिक्कीचे कुलुप उचकटलेले दिसले . डिक्की उघडून पाहिली असता डिक्कीमध्ये १ लाख रुपये नसल्याचे दिसले . त्यानंतर लगेच मित्र मोहन इंगोले यास घडलेला प्रकार सांगुन विचारपुस केली .त्यानंतर १ लाख रुपये चोरी झाले असल्याचे माझ्या लक्षात आले . अशा आशयाची फिर्याद श्री.लेंडवे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे .


0 Comments