महावितरण कंपनीच्या महूद उपविभागाचे सहाय्यक अभियंता बाळकृष्ण खरात यांच्याकडून १० हजार रुपये लाचेची मागणी
सांगोला/प्रतिनिधी- महूद ता. सांगोला महावितरण कंपनीच्या उपविभागामधील सहाय्यक अभियंता बाळकृष्ण खरात यांच्याकडून लोटेवाडी ता-सांगोला येथील वीजग्राहक श्री. प्रकाश गोरख लवटे यांना पिठाच्या गिरणीचे लाईट कनेक्शन घेण्यासाठी १० हजार रुपये एवढ्या लाचेची मागणी करण्यात आली आहे.श्री बाळकृष्ण खरात यांच्याकडून अशा प्रकारची लाच मागितल्यामुळे महावितरणाचा अनागोंदी कारभार पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे. संपूर्ण देश कोरोनामुळे आर्थिक मंदीतून जात असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे लाच मागणे म्हणजे गोरगरीब जनतेला वेठीस धरणे होय. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे सहकार्य करण्याऐवजी वीज ग्राहकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असेच वागतात. संबंधित अधिकारी खरात यांनी या अधी बऱ्याच लोकांकडून लाच स्विकारुन महावितरणच्या नावाला गालबोट लावले आहे.महावितरण कंपनीच्या महूद उपविभागात अनेक समस्या असताना सहाय्यक अभियंता व त्यांचे सहकारी कर्मचारी लोकांना सहकार्य करण्याऐवजी लोकांच्याकडून चिरीमिरी घेण्यातच व्यस्त आहेत. तरी संबंधित वरीष्ट अधिकऱ्यांनी या प्रकरणात वेळीच लक्ष घालून अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.


0 Comments