एसटी महामंडळ कडून एसटी बसेस मध्ये सोशल डिस्टंसिंग चा फज्जा ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एसटीमध्ये कडक उपाययोजना करण्याची गरज सोलापूर जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाह्य एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये सर्रास सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळत आहे.
लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसेस मध्ये आसन क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी भरून या बसेस धावत असल्याचे दिसून येत आहे. या बसेस मध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना रोखण्या विषयी करण्यात आलेल्या उपायोजना ची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे सर्रासपणे या बसेसमध्ये उल्लंघन होत असूनही याकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळास कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसोंदिवस सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. आज दिवसभरात जवळपास सोलापूर जिल्ह्यात नवीन ९९ रुग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन या आकड्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहून सोशल डिस्टंसिंग ठेऊन , मास्क वापरून अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.


0 Comments