महूद ( वार्ताहर ) : - सांगोला तालुक्यातील महूदच्या उत्तरेला असणाऱ्या वाडी वस्ती परिसरात गेल्या आठवड्यात नागरिकांना जंगली हिस प्राणी दिसला होता . हा अज्ञात हिंस्र प्राणी अजूनही याच भागात लपून बसला असून , तो अधून मधून शेळ्यावर हल्ला करत आहे .
त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत येथील काही शेळ्या , बोकड ठार झाले आहेत . यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून नागरिकामध्ये भीतीचे सावट पसरले आहे . गेल्या आठवड्यात शनिवारी महूद परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती . तेव्हा वनाधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यानी तत्काळ या परिसरात येऊन पाहणी केली . त्याच्या पायाच्या ठशावरून व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलेल्या माहितीवरून तो विवटया नसून तरस किंवा इतर प्रकारचा जंगली प्राणी असल्याचे सांगितले होते . महूदच्या उत्तरेला असणाऱ्या ठोंबरेवाडी , कोळेकरवस्ती , येडगेवाडी , कारडेवाडी ( महिम ) या भागात हा जगली प्राणी दिसला होता . यावावत नागरिकांनी तांबूस रंगाचा प्राणी पाहिल्याचे सांगितले . वन कर्मचाऱ्यांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला . या परिसरातील काही उभ्या पिकामध्ये व उसामध्येही या प्राण्याचाशोध घेण्यात आला , मात्र तो कोठेही आढळून आला नाही . महूदच्या उत्तरेकडील भागात , वाडी - वस्ती परिसरात उसाचे व इतर पिकांचे क्षेत्र जास्त आहे . काही ठिकाणी दाट झाड़ी सुद्धा आहेत तर काही ठिकाणी माळरानाचापरिसरही मोठा आहे . त्यामुळे या जंगली प्राण्यासाठी हा भाग सुरक्षित असल्याने त्याचा वावर गेले आठवडाभर या परिसरात आहे . या जंगली प्राण्याला हुसकावून लावण्याकरिता वन कर्मचाऱ्यांनी दोन दिवस प्रयत्न केले . स्थानिकांच्या मदतीने रात्रीची पाहणी केली . रात्री फटाके फोडून त्याला या भागातून हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले . मात्र या भागातच तळ ठोकलेला हा प्राणी अधून मधून शेळ्या , बोकड , मेंढ्या यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारत आहे . त्याचे मांस खाऊन पुन्हा लपून बसत आहे . भूक लागल्यानंतर बाहेर पडून पुन्हा हल्ला करत आहे . त्याच्या हल्ल्यात या भागातील काहीशेतकऱ्याच्या शेळ्या व बोकड ठार झाले आहेत . हा जंगली प्राणी अगदी दिवसाढवळ्या सुद्धा शेळ्या - मेंढयावर हल्ला करून त्याना ओढून नेत आहे . शुक्रवारी दुपारीही या प्राण्याने या परिसरातील महादेव मेटकरी याच्या घरासमोर असणाऱ्या शेळ्यांवर हल्ला केला होता . त्यात काही शेळ्या जखमी झाल्या आहेत . लोकांनी आरडाओरडा करत त्याला हुसकावून लावल्यानंतर तो पळून गेला . या जगली प्रापयाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाने पुढील व्यूहरचना करावी , अशी मागणी या भागातील नागरिकामधून होत आहे .


0 Comments