google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा चेक पोस्ट मायाक्का देवी यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांना चिंतेची बातम्या

Breaking News

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा चेक पोस्ट मायाक्का देवी यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांना चिंतेची बातम्या

 मायाक्कादेवी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांंसाठी चिंतेची बातमी ; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा चेक पोस्ट ; थर्मल स्क्रीनिंग नंतरच कर्नाटक राज्यात एन्ट्री ! 


महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कर्नाटक राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून मायाक्का चिंचली या यात्रेसाठी जाताना यात्रेकरूंना मोठी अडचण निर्माण होणार आहे.आज पासून कर्नाटक राज्यात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर चेकपोस्ट उभे केले असून सद्या तरी या मार्गावरून येणाऱ्या नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे.परंतु येणाऱ्या २ ते ३ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकांना ऑंटी जन टेस्ट किंवा rt-pcr टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट घेऊनच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मायाक्का देवी चिंचणी यात्रेच्या लगबगीत असणाऱ्या भाविकांची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments