google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूल प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ !

Breaking News

मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूल प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ !

 सांगोला तालुक्यात नॅशनल हायवे क्र.१६६ च्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूल प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ !


 सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी - नागपूर या नॅशनल हायवे नं. १६६ च्या कामासाठी चाळीस धोंडा (बुरलेवाडी ) ते तिप्पेहळ्ळी (सांगली जिल्ह्या हद्द) या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनीतुन शासनाची परवानगी,किंवा शेतकऱ्यांची सहमती न घेता शासनाची रॉयल्टी न भरता बेकायदेशीरपणे लाखों ब्रास मुरमाची संबंधित कन्ट्रक्शन कंपनी यांनी चोरी केली आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीत मोटो मोठे खड्डे पडले आहेत. या कंट्रक्शन कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना न जुमानता त्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन करत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे केलेल्या आहेत परंतु या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गा मधून केल्या जात आहेत.काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरूनच संबंधित कन्ट्रक्शन कंपनीला नोटीस द्वारे कोट्यवधी रुपयांच्या दंडाच्या नोटीसा बजावलेल्या आहेत. महसूल प्रशासन हे सदर कंट्रक्शन कंपनी कडून दंड वसुली करेलही परंतु ज्या शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीमध्ये मुरूम उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरून कोण देणार असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. महसूल प्रशासनाने वेळीच या सर्व प्रकाराकडे लक्ष दिले असते तर सदरचा प्रकार घडलाच नसता असे बाधित शेतकरी वर्गाला मधून बोलले जात आहे.सांगोला तालुक्यात या नॅशनल हायवे चे काम करणाऱ्या दोन कंट्रक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यावर सांगोला तालुका महसूल प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही.त्यामुळे या कंट्रक्शन कंपनीचे कर्मचारी राजरोसपणे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मधून दमदाटी करून बेकायदेशीर उत्खनन करत आहेत त्यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कन्ट्रक्शन कंपनीवर व संबंधित महसूल प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग मधून केली जात आहे.


Post a Comment

0 Comments